मोटारसायकल चोरट्यास मुद्देमालासह शनिपेठ पोलिसांकडून अटक

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-शहरातील पोलन पेठ येथील जी.व्ही.कारडा या देशी दारूच्या दुकानासमोरून दि.12 जानेवारी रोजी मजुराची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती सिंधी कॉलनी येथील वासुदेव गगनदास किनडा हे पोलन पेठ येथील जी.व्ही.देशी दारूच्या दुकानावर मजूर म्हणून कामाला आहे.

दि.12 जानेवारी रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास दुकानबंद करून घरी जाण्यासाठी निघाले असता दुकानासमोर उभी केलेली त्यांची मोटारसायकल एमएच 19 एयु 0171 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

याप्रकरणी किनडा यांच्या फिर्यादी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बेंद्रे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे यांना मिळाली होती.

त्यांच्या माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस निरिक्षक प्रविण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन बेंद्रे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, अनिल धांडे, जितेंद्र सोनवणे, अभिजीत सैंदाणे, योगेश बोरसे, सामेश गरड आदींच्या पथकाने जुना आसोदा रोड येथे सापळा रचून संशयित मोटारसायकल चोरट्यास अटक केली. संशयिताची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली देत चोरीला गेलेली मोटारसायकल काढून दिली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. दरम्यान, पुढील कारवाईसाठी चोरट्यास शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सोन्याचे पेन्डल चोरणार्‍या महिलेस अटक

शहरातील सराफ बाजारातील एका ज्वेलर्स दुकानातून काही दिवसांपूवी एका महिलेने चार ग्रॅमचे सोन्याचे पेंडल लांबवून नेले. दुकानदाराला संशय आल्याने त्यांने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, याच महिलेने पेंडल चोरल्याचे दिसून आले.

याप्रकरणी आज शहर पोलिसांसह शनिपेठ पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून चोरीला गेलेले पेंडल मिळून आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सराफ बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला सोने खरेदीसाठी आली. त्यानंतर काही वेळातच ती महिला तेथून निघून गेले.

परंतू, सोन्याचे पेन्डल चोरीला गेल्याचे दुकान मालकास लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना महिलेने पेन्डल चोरल्याचे दिसून आले.

यावेळी त्या महिलेचा घराचा पत्ता दुकान मालकास मिळाला. ही बाब दुकान मालकांनी शहर पोलिसांना सांगितल्यावर सोमवारी शहर पोलिसांनी त्या महिले घरून ताब्यात घेतले.

यावेळी चौकशी केल्यानंतर तिच्याजवळी चोरीला गेलेले चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेन्डल मिळून आले आहे. दोन दिवसांपूवी फुले मार्केट येथून देखील एका महिलेची पिशवी चोरीला गेली होती.

ती देखील या महिलेने चोरी केली असल्याची कबूली दिली आहे. महिलेस मानसिक आजार असल्याचे सांगण्यात येत होते. पुढील करवाईसाठी शहर पेलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*