रोटरी प्रीमिअर लीगचा ‘वेस्ट रायजर’ विजेता

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-सागरपार्कवर रोटरी वेस्ट आयोजित रोटरी प्रिमीयर लीग स्पर्धेत अंतीम सामन्यात वेस्ट रायजर संघाने वेस्ट वॉरियर संघावर 9 गड्यांनी विजय मिळवीत स्पर्धेचा चषक प्राप्त केला.

या सामन्यात अ‍ॅड.सचिन मराठे यांनी सामनावीराचा सन्मान प्राप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे नियोजित प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.

उपांत्य सामान्यामध्ये प्रथम वेस्ट रायडर्स विरुद्ध रोटरी गोल्ड सिटी ए यांच्यात वेस्ट रायडर्सने बाजी मारली. तर वेस्ट सुपर किंग विरुद्ध वेस्ट वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट वॉरियर्स संघ विजयी झाला. यानंतर जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या दोन संघात प्रदर्शनीय सामना झाला.

उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यामध्ये केतन पोरवाल, लव काबरा, समकित मुथा, अतुल कोगटा, विश्वेश स्वर्णकार, अ‍ॅड.राहुल लाठी यांनी सामनावीराचा बहुमान प्राप्त केला.

तीन दिवसात 12 संघांमध्ये 10 षटकांचे 19 सामने दिवस-रात्र पद्धतीने खेळले गेले. त्यात उत्कृष्ठ फलंदाज अतुल कोगटा, उत्कृष्ठ गोलंदाज विश्वेश स्वर्णकार, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अ‍ॅड.सचिन मराठे तर मालिकावीराचा सन्मान केतन पोरवाल यांना प्रदान करण्यात आले.

रोटरी वेस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरज जहाँगीर, मानद सचिव कृष्णकुमार वाणी व प्रकल्प प्रमुख अ‍ॅड.सचिन मराठे यांच्या नेतृत्वात रोटरी वेस्टच्या सदस्यांनी सामन्यांचे नियोजन केले होते.

संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून जैन स्पोर्टस अ‍ॅकेडमीचे मनिष चौबे, सिद्धेेश देशमुख, संकेत पांडे, शितल कोतुल, पवन सोनवणे, विशाल विश्वकर्मा, स्वप्नील जाधव यांनी तर गुणलेखक म्हणून महम्मद फैजल यांनी काम पाहिले. समालोचन अय्याज मोहसिन यांनी केले.

LEAVE A REPLY

*