ग्लोबल वार्मिंगमुळे अंटार्टिकाचा बदलतोय रंग

0
लंडन | वृत्तसंस्था :  जलवायू परिवर्तनाचा अनपेक्षित प्रभाव अंटार्टिकामध्ये पाहण्यास मिळत आहे. बर्ङ्गाच्या जाड थराने आच्छादलेल्या या प्रदेशाचा वाढत्या तापमानामुळे नकाशाच बदलून टाकला आहे. तिथे हळूहळू पांढर्‍या बर्ङ्गाच्या जागी हिरवळ नजरेस पडू लागली आहे.

१९५०च्या दशकापासूनच अंटाक्रि्टकाच्या तापमानात सतत वाढ होत आहे. जगातील अन्य भागात वाढलेल्या सरासरी तापमानापेक्षा त्याचा वेग जास्त आहे.

या कालावधीत तिथे शैवाल उगविण्याचा वेगही बराच वाढला आहे. दरवर्षी गेल्यावर्षाच्या तुलनेत तिथे ४ ते ५ पटीने जास्त शैवाल उगत आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

केंब्रिज विद्यापीठ आणि ब्रिटिशा अंटार्टिका सर्वेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे अंटाक्रि्टकावर गेल्या १५० वर्षांच्या कालावधीत उगवलेले शैवाल व कायईचे अध्ययन केले. या अध्ययनात सहभागी डॉक्टर मॅट एम्सब्रे यांनी सांगितले की, ग्लोबल वॉर्मिंमुळे अंटाक्रि्टकामध्ये मोठया प्रमाणावर नाट्यमय बदल झाले आहेत.

सरासरी पाहिल्यास १९५०च्या आधी व नंतर शैवाल व काई उगविण्याचा वेग चार ते पाचपटीने वाढला आहे. या संशोधनामध्ये पृथ्वीला आणखी उष्ण बनविण्यामध्ये या शैवालाची काय भूमिका आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

अर्थात येणार्‍या प्रदीर्घ काळपर्यंत अंटार्टिकाचा बहुतांश हिस्सा बर्ङ्गाने आच्छादलेला राहील, मात्र बर्ङ्ग वितळल्यानंतर उगवत असलेले शैवाल जगाच्या बदणार्या चित्राबाबत मोठा इशारा ठरू शकतो, असेही शास्त्रज्ञांनी नमूद केले.

जलवायू परिवर्तनासोबतच प्लास्टिक कचरा, प्राण्यांच्या नष्ट होणार्या प्रजाती, इंधनज्वलनामुळे होणारा धूर व अण्वस्त्रांच्या चाचण्या या सगळ्यांचा पृथ्वीवर कायमस्वरुपी परिणाम होत राहील.

LEAVE A REPLY

*