बोहर्डी बुद्रूक जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार

0
वरणगाव, ता.भुसावळ |  वार्ताहर :  तालुक्यातील बोहर्डी बुद्रूक येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेत शिक्षण घेणार्‍या आठ-दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करीत होता. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना. दि.१८ रोजी उघडकीस आली. याबाबत वरणगाव पोलिसात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोहर्डी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते (वय ४८, रा.मच्छिंद्र नगर, वरणगाव) हा नराधम मुख्याध्यापक गेल्या तीन वर्षापासुन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचा प्रकार एका विद्यार्थिनीने घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला.

काही दिवसांपूर्वी इयत्ता ४ थीमधील विद्यार्थिनीला कोलते यांनी त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला बोलावून वर्ग बंद करुण त्याच्या मोबाईलवर अश्‍लिल चित्रफीत दाखवून लैंगिक चाळे केले. विद्यार्थिनीच्या शरिराला दुखापत झाल्याने ती रडत घरी गेली व घडलेली घटना मोठ्या बहिणीला सांगितली. तीने आईला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

यानंतर उर्वरित मुलींनीही सर आम्हालाही असेच अश्‍लिल चित्रफीत दाखवून आमच्या अंगावरुन हात ङ्गिरवतात व केस पकडून कुठे व कुणाला ही गोष्ट सांगितल्यास तुमच्या दाखल्यावर लाल शेरा मारीन मग तुला व तुझ्या वडिलाना मी व गावातील लोक बाहेर काढून देतील. अशा धमक्या देत असल्याची माहिती गावातून समोर आली.

याप्रकरणी वरणगाव पोलिसात विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.६३/१७, भा.दं.वि. कलम ३७६, (क) (आय), ३५४ अ (१, २, ३), ५०६ बाल लैंगिक गुन्हा कलम ६, १०, १२ प्रमाणे संशयित गणेश चुडामण कोलते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित फरार झाला आहे.

याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, फैजपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनेचा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पो.स्टे.चे एपीआय जगदीश परदेशी, पो.हे.कॉं. सुनील वाणी, रवींद्र बोंडे आदी करीत आहे.

सदर मुलींना जळगाव येथे मेडीकलसाठी घेऊन गेले असता त्याठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने या मुलींना त्याठीकाणी दिवसभर थांबवून ऍडमीट होण्याचा सल्ला देण्यात आला. अगोदरच घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेतील मुली रडायला लागल्या व पुन्हा दवाखान्यातील गलथान उघडकीस आला.

LEAVE A REPLY

*