वीज वापरली नसतांनाही आम्ही लाभार्थी ? होय.. हे आमचे सरकार

0
  • शेंदुर्णी येथील महावितरणचा महागोंधळ
  • वीज वापरली नसतांनाही थकबाकीची बीले
  • वरिष्ठांकडून उमरटपणाची भाषा

दिग्विजय सूर्यवंशी | शेंदुणी, ता. जामनेर :  महावितरण आपल्या दारी या योजनेतर्ंगत कृषी पपंासाठी सहा वर्षापुर्वी डिमाड नोट भरली. कृषी पंपासाठीचे कनेक्शन मंजुरही झाले. परंतू शेतात ना वीजेचा खांब आला ना वीज मिटर आले, ना वीज पंपाने पाणी ओढले. तरीही तब्बल सहा वर्षांनी महावितरणे आम्हा शेतकर्‍यांना हजारो रूपयांचे थकबाकीचे बील धाडले… होय आम्ही (कागदावरचे) लाभार्थी… होय हे आमचे सरकार महाविरण आणि शासनाची अशा प्रकारची खिल्ली शेंदूर्णी परिसरातील शेतकर्‍यांकडून उडवली जात आहे.

दै. देशदुत मध्ये दि. १७ रोजी ’वीज नसतांनाही दिले ४२ हजारांचे बील ’ या मथळ्याखाली येथील शेतकरी भगवान सोनार यांना सहा वर्षांनी आलेल्या थकबाकीच्या बीलाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. वृत्त वाचुन अनेक शेतकर्‍यांच्या बाबतीतही अशाच घटना घडल्या असल्याचे समोर आल्याने महावितरणचा गलथान कारभार उघड झाला आहे.

मुख्य अधिक्षकांची टाळाटाळ

याबाबत स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता स्वतःच्या जबाबदार्‍या झटकत टाळाटाळ केली. त्यामुळे महावितरणच्या मुख्य अधिक्षक अभियंत्यांना याबाबत संपर्क साधला असता फंक्शनला / मिटींगला बसल्याचे सांगून तेथील स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा मोफत सल्ला देते संतापत जबाबदारी झटकून फोन ठेवून दिला.

वीजबिल माफिच्या योजनांचा भोगंळ कारभार

दि . १७ रोजी महावितरणच्या गलथान कारभारावर प्रकाशझोत टाकत शेतकर्‍याच्या सन २०११ मध्ये वीज मीटर मागणी अर्जा नुसार कोणतीही अंमलबजावणी न करता, दुरपर्यंत वीज कनेक्शन नसतांनाही ४२ हजारांचे थकबाकी बील पाठविल्याचे आणि महावितरणचा गलथान कारभाराचे वृत्त दै देशदूत मधुन प्रकाशित होताच अनेक शेतकर्‍यांनी आपल्या बाबतीतही असेच घडल्याचे दै. देशदुतकडे मांडली. चार पाच वर्षांपासुनची लाखोंची थकबाकीची बीले अचानकपणे शेतकर्‍यांना भरण्याच्या शेवटच्या दिनांकाला प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांमध्ये खळबळ व्यक्त झाली.

अधिक्षक अभियंत्यांची उरमट भाषा

महावितरणच्या गलथान कारभाराबाबत जळगावचे मुख्य अधिक्षक अभियंता यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी साधे बोलणेही ऐकुन न घेता उरमट भाषेत बोलत मी महत्वाच्या फंक्शनमध्ये आहे. यासाठी उपअधिक्षक अभियंता, आणि इतर अधिकार्‍यांशी संपर्क साधा. मला फंक्शन महत्वाचा आहे.असे सांगून फोन ठेवून दिला.

उपअधिक्षक अभियंत्यांनी केली कमाल

उपआधिक्षक अभियंता भुसावल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना त्यांचा वेळ महत्वाचा असल्याचे सांगत आपण आमच्या कनिष्ट अभियंत्याना सांगा. त्यांना वारंवार साधी चौकशी करून माहीती घेण्याची विनंती करून देखील टाळाटाळ करून जबाबदारी झटकली.

अर्ज द्या वीज कनेक्शन बंद करू ..

येथील स्थानिक अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, शेतकर्‍याला अर्ज करायला सांगा आम्ही कनेक्शन बंद करू. परंतु, शेतात ना वीजेचे खांब गाडले गेले ना तारा ओढल्या गेल्यात ना मिटर दिले गेले आणि ना वापर झाला. अर्ज देवूनही अभियंता कनेक्शन कसे बंद करतील. वीज कनेक्शनच पोहचले नसल्याचे माहिती असुन देखील वायफाय वीज कनेक्शन बंद करणार का अशी विचारण केली असता निरुत्तर झाले.

महावितरणने ही माहिती जाहिर  करावी : शेतकर्‍याचे आवाहन

महावितरणने मला कनेक्शन कधी दिले आणि कोठून दिले, किती खांब गाडले, ते सरळ गाडले की आडवे गाडले, किती गाडले, सिमेंटचे होते की लोखंडाचेे होते की पत्र्याचे होते, किती खंाब होते. त्याचा खर्च कोणी केला. मिटर कोणत्या कंपनीचे दिले होते. त्याची चालू असल्याचे टेस्टंीग केली होती का, हे मिटर कोणत्या कर्मचार्‍याने बसविले. दर महिन्याला किती वीज वापरली यासह अनेक बाबीची माहिती महावितरणने जाहीर करावी. असे आवाहन शेतकरी भगवान सोनार यांनी महावितरणला दिले आहे.

पत्रकारांना उर्मट वागणुक तर सामान्य नागरीकांचे काय ?

महावितरणचे वरीष्ट अधिकारी पत्रकारांसोबत उर्मट पध्दतीने बोलत असतील तर सामान्य नागरीकांना कशी वागणुक मिळत असेल हा प्रश्न उपस्थीत होतो.

विनामिटरचे वीज कनेक्शन

या बाबत सखोल माहिती घेतली असता कृषीपंपाना जी कनेक्शन देण्यात आली त्यांना कनेक्शन सोबत मीटरच दिलेले नसल्याने अंदाजे मनात पटेल तशी वीज बील आकारणी करुन हजारोंच्या दंड व्याजासह विज बीले पाठविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

सततच्या दुष्काळानेे शेतकरी हवालदिल

तीन चार वर्षातली परीस्थीती बघता सततचा पडणारा दुष्काळ, नापीकी, कवडीमोल भाव यांमध्ये आधिच कंबरडे मोडले असुन पाण्याची पातळी देखील खालावली असल्याने शेती करणे अवघड झाले आहे. शेतामध्ये कष्ट करूनही पदरी निराशा पडत आहे. काही शेतकर्‍याच्या विहीरीतून दिवसातुन फक्त एक तासापर्यंत मोटर सुरू असते. अशी परीस्थाती असतांनाही वापर नसतानाही अव्वाची सव्वा बीले पाठवुन महावितरणने पार आत्महत्या करण्यालायक करून सोडले असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

शासनाच्या विजबील माफीचे काय ?

शासनाने मागील वर्षांमध्ये दिलेल्या वीज बील माफीचा फज्जा उडवत मार्च २०१७पर्यंतची थकबाकी दाखवित लाखोंची बीले पाठविली आहे. त्यामुळे शासनाने केलेली वीजबील माफी हि फक्त पोकळ आश्वासने होती का असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थीत केला.

वीज कनेक्शनचा अर्ज , प्रत्यक्ष कनेक्शनचा पत्ताच नाही

मागील वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी अर्ज केला होता. त्यानुसार डिमांड नोटदेखील भरण्यात आली होती परंतु , वारंवार मागणी करुन देखील कनेक्श मिळाले नाही. त्यामध्ये २०११ साली आलेल्या महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत त्वरीत कनेक्शन मिळणार होते. तसेच , ३० मीटर पर्यंत केबल कनेक्शन आणि ३० मीटरच्यावर लागणारा सर्व खर्च महावितरण करणार होते. परंतु, त्याला देखील केराची टोपली देत प्रत्यक्ष कनेक्शनचा पत्ताच नाही आणि डायरेक्ट थकबाकीची लाखोची बीले.

मीटर नसतांना अंदाजे बीले कशी ?

अधिक माहिती घेतली असता वीज वापरानुसार बील पाठविणे अपेक्षित आहेत. परंतू, शेतकर्‍यांनी वारंवार मागणी करून देखील मीटर बसविण्यात आलेले नाही. तसेच, अनेक शेतकर्‍यांच्या शेतात रोज अर्धा तासच मोटर सुरू आहे. आम्ही वापर करीत नसतांना देखील अव्वाच्या सव्वा वाढीव बीले आली आहे . त्यामुळे दुष्काळ सदृष परीस्थीती असतांना थकबाकी दंडनिय व्याजासह बीले दिल्याने संतापाचे वातावरण आहे.

शेतकर्‍यांनी गेल्या पाच दहा वर्षांपासुन शेतीपंपासाठी केलेला अर्जावरून डिमांड नोट भरुन देखील कनेक्शनचा लाभच घेतलेला नसतांना कागदोपत्री घोडे नाचवून लाभार्थीला लाभ मिळाल्याचे माहिती नसतांना मी लाभार्थी .. होय हे आमचे सरकार असल्याचा अनुभव े बील बघुन लक्षात आला असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*