श्री भगवान परशुराम समितीतर्फे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून ‘दशक्रिया’ चित्रपटाला विरोध

0
जळगाव |  प्रतिनिधी :  ब्राह्मण समाजाची बदनामी व इतर समाजाची दिशाभुल करीत असलेल्या ‘दशक्रिया’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढीत पिंडदान करून श्री भगवान परशुराम समितीने चित्रपटाला विरोध दर्शविला.

शहरातील महाबळ परीसरात श्री भगवान परशुराम समितीतर्फे ‘दशक्रिया’ या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवून या टिमचा निषेध केला. तसेच महाबळ चौक येथे चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली.

दरम्यान ज्याप्रमाणे कुंभार, नाभिक, लाकुड विक्रेते, सोनार, शिंपी, तांबट, किराणादुकानदार, गवळी यांना त्यांच्या व्यवसायातुन रोजगार मिळतो त्याचप्रमाणे विधी करणे हा देखिल ब्राह्मण समाजाचा रोजगार असल्याचे श्री भगवान परशुराम समितीने म्हटले आहे. त्यामुळे ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या माध्यमातुन ब्राह्मण समाजाची बदनामी करणार्‍या टिमचा निषेध व्यक्त करीत असल्याचे पत्रकाद्वारे नमुद करण्यात आले आहे.

तसेच पद्मावती चित्रपटाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात भुपेश कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, अशोक साखरे, निलेश कुळकर्णी, चंद्रकांत वैद्य, भुषण मुळे, तेजस जोशी, गजानन जोशी, अजय जोशी, रोहन जोशी, अजय डोहळे, गौरव जोशी, हेमंत जोशी, विजय देशपांडे, देवेंद्र साखरे, अंकुर देशपांडे, विनायक जोशी, सुनिल जोशी, प्रसाद पिंपळे, वैभव शूर, सुनिल पाठक, शैलेश जोशी, श्रीपाद जोशी, सुनिल कुळकर्णी यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*