बाळासाहेब, शिवसैनिकाची योग्य कदर करायचे

0
धरणगाव, |  प्रतिनिधी :  शिवसेनेत सामान्य शिवसैनिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवसैनिक निष्ठावान व जीवाला जीव देणारा असतो. अश्या सच्चा शिवसैनिकाची बाळासाहेब स्वत: जातीने दखल घेत. त्याच्या पदरात योग्य माप टाकत. म्हणून आजही बाळासाहेब नसले तरी त्यांनी पाहिलेले स्वप्न शिवसैनिक निश्चित पूर्ण करतील. एक दिवस या महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्‍वास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला.

धरणगाव शहरात सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेबांचे कार्यकर्त्यावर असलेले प्रेम व जिव्हाळा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तसेच चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी बाळासाहेबांसारखा नेता होणे शक्य नाही, असे मत व्यक्त केले.

शेवटी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या भाषणात साहेबांचा आठवणी सांगितल्या साहेब हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात त्याचा दबदबा होता,आशा अनेक आठवणी गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

यावेळी शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, नगरसेवक वासू चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, धिरेंद्र पुरते, बुट्या पाटील, उपशहर प्रमुख भरत महाजन, रवी बंटी महाजन, डी ओ पाटील, सभापती दीपक सोनवणे,भारतीय जनता पक्षाचे गुलाब मराठे, वसीम पिंजारी, कॉंग्रेसचे चंदन पाटील, गोपाल पाटील, राष्ट्रवादी चे मा नगरसेवक निलेश चौधरी गजानन महाजन, राहुल रोकडे, सर्व पक्षीयनेते उपस्थित होते सूत्रसंचालन कार्यलयप्रमुख विनोद रोकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

*