पाचोरा न.पा.च्या सभेत विरोधकांचा गदारोळ

0

पाचोरा | प्रतिनिधी :  पाचोरा नगरपालीकेच्या तिसर्‍या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व प्रशासनाच्या कामकाजाबाबत विरोधकांनी तिव्र नाराजी व्यक्त करत आपला प्रखर विरोध दर्शविला.

सभेतील २१ विषयांपैकी विकास कामांच्या विषयाला विरोध न करता सभेतील सदस्यांचे दिशाभुल करणार्‍या विषयांवर विरोधकांनी गदारोळ केला. एका विषयावर मतदान प्रक्रियेतून विरोध दर्शवत तर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक सदस्य पाठवण्यावरून खडाजंगी झाली.

वेळीच सर्वांनी सामंजस्याची भुमीका घेतल्याने तुर्ती वाद मिटला. सत्ताधार्‍यांचा वेळकाढू धोरण व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची चुकीची कार्यप्रणालीचा विरोधकांनी एकजुटीने खरपूस समाचार खेतला व प्रशासनास धारेवर धरले.

पाचोरा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सर्वसाधारण सभेत व्यासपिठावर उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण बाविस्कर हे होते.

तर नगरपालीका सभागृहात राष्ट्रवादी गटनेते संजय वाघ, जनाधार विकास आघाडी गटनेते अमोल शिंदे, भाजपा गटनेत्या विजया शिंदे, नगरसेवक वासुदेव महाजन, राम केसवाणी, शितल सोमवंशी, अशोक मोरे, रङ्गीक बागवान, सतिष चडे, धर्मेंद्र चौधरी, मनिष भोसले, विष्णू अहिरे, सुचेताताई वाघ, हर्षाली जडे, सिंधुताई शिंदे, मालती हटकर, हजराबी तडवी, रंजना भोसले, सईदाबी खान, प्रियंका पाटील, दिपक पाटील, डॉ.भरत पाटील तर प्रशासनातील अमोल चौधरी, धनराज पाटील, अनिल पाटील, श्री.राठोड आदी उपस्थित होते.

सभेचे कामकाज सुरू होण्याअगोदर शहरातील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राजेश शिंपी यांनी मागील सेचे इतीवृत्त वाचून ते कायम करण्यासाठी सभागृहापूढे ठेवले. त्यानंतर सभेतील पहीला ३८ क्रमांकाचा विषय मांडण्यात आल.

संभाजी राजे चौकात पुतळा उभारणे व सुशोभीकरण करणे यावर गटनेते अमोल शिंदे यांनी छ.संभाजी राजांच्या जयंती दिनी राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्या समोरील अस्वच्छते बाबत सत्ताधारी व प्रशासनाला जाब विचारला.

तर गटनेते संजय वाघ यांनी ही मागणी याअगोदर नगरसेवक विकास पाटील व संभाजी ब्रिगेडने केली. त्यांचा उल्लेख का टाळला असा प्रश्‍न करत मा.ज्योतिबा ङ्गुलेंच्या पुतळ्याप्रमाणे या कामासही वेळ लावू नका असे सांगितले.

विषय क्र.३९ ते ५० यात शहर विकास कामांना मंजूरी देण्यात आली. त्यात हागणदारीमुक्त शहरसाठी राज्यस्तरीय समितीने दिलेल्या भेटी प्रसंगी नगरसेवक म्हणून विरोधकांना बोलावले नाही म्हणून प्रशासनाला संजय वाघ व अमोल शिंदे यांनी जाब विचारला.

विषय क्र.५१ मध्ये साङ्ग सङ्गाई व घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदी करण्यासाठीच्या प्राप्त ई-निवीदा मंजूरी देण्याच्या विषयात प्रशासनाने घनकचरा संकलन ठेका हा सुमारे १ कोटींचा विषयही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र अमोल शिंदे यांनी वाहन खरेदी करणे व घनकचरा संकलन ही दोन्ही वेगळे विषय असून प्रशासनाने सभागृहातील सदस्यांची दिशाभूल करू नये व तो विषय वेगळा मांडावा असे स्पष्ट केले. प्रशासनाने यावर सावरा सावरा करत आपली चुक लपवण्याचा प्रयत्न केला.

स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी झालेल्या खर्चाच्या मंजूरी देण्याच्या विषयावर संजय वाघ व अमोल शिंदे यांनी प्रशासनाला त्यांच्या चुकांचा जाब विचारला.

नगरसेवकांना प्रत्यक्ष संपर्क साधून नियंत्रण का ठेवण्यात आले नाही, कोनशिलेवर गटनेते म्हणून नावे का टाकण्यात आली नाहीत, नगरसेवक मनिष भोसलेचे नाव स्विकृत नगरसेवकांच्या खाली का टाकण्यात आले? नगरसेवकांची नावे योग्य क्रमाने का घेण्यात आली नाहीत.

माजी आ.तथा २० वर्षे ज्यांनी नगरपालीकेत सत्ता भोगली असे दिलीप वाघ यांच्या नावाचा उल्लेखही पत्रीकेत घेतला नाही. याउलट माजी आ.आर.ओ.पाटील यांचा उल्लेख घेण्यामागील राजकारण काय? अशा अनेक बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून देत सत्ताधारी व प्रशासनाची विरोधकांबाबत असलेल्या दुटप्पी धोरणाची जाणीव यावेळी करून दिली.

शहरातील रस्ते करण्याच्या ५३ व्या क्रमांकाच्या विषयावर मतदान घेवून विरोध दर्शविला. तसेच भुयारी गटारींचे कामे होतांनाही रस्ते खराब होतील म्हणून नगरपालीकेचे आर्थीक हित जोपासणे गरजेचे असल्याचे मत विरोधकांनी यावेळी मांडले.

घरकुल योजने बाबत समाजात समाज जागृतीच्या प्रशासनास सुचना देण्यात आल्या. शेवटच्या ५८ व्या विषयात प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपनगराध्यक्ष शरद पाटे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यास मंजूरी देणे असा वाचन केला.

यावरून अमोल शिंदे व संजय वाघ यांनी विरोध दर्शवत नगरसेवक मनिष भोसलेंचा प्रस्ताव पाठविण्याचे सर्व उपस्थित विरोधकां९च्या स्वाक्षरीचे पत्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले. तर सदर विषयास स्थगीती देण्याचा अधिकार नगराध्यक्ष म्हणून मला आहे असे सांगत नगराध्यक्ष संजय गोहील यांनी हा विषय स्थगीत ठेवण्यात येते असे सांगताच विरोधकांनी गदारोळ केला.

विषय पत्रीकेत विषय आला आहे आणि तो सभेसमोर मांडण्यात आला असून त्यास स्थगीती करता येणार नाही म्हणून विरोधक आपल्या भुमीकेवर ठाम राहीले. यावेळी नगराध्यक्षांची बाजू सांभाळण्याचा सत्ताधार्‍यांनी प्रयत्न केला.
पाचोरा नगरपालीकेची तिसरी सर्वसाधारण सभा ही विरोधकांच्या अभ्यासू वृत्तीमुळे एव्हढी गाजेल असे सत्ताधारी व प्रशासनाने विचारातही घेतले नसेल. मात्र विरोधकांच्या एकजूट विरोधामुळे सत्ताधारी व प्रशासनाला घाम ङ्गूटला.

विरोधकांनी केला विकासाला विरोध

पाचोरा नगर पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी निव्वळ वीरोधाला विरोध म्हणून विकासालाच विरोध केला आहे. दलित वस्ती सूधारणा योजने अंतर्गत प्रभाग क्र.१ मधिल ७३ लक्ष रूपयांचे रस्ता कॉक्रेटिकरणाचे काम नारायण नगर व आदर्श नगर मधील २६ लक्ष चे रस्ता कॉक्रेटिकरणाचे काम, भडगाव रोड मार्केट गेट समोरील रस्त्याचे डांबरीकरण व बाजोरीया नगर मधील ८ लक्ष रूपयांचे डांबरीकरणाचे काम या विषयाला सर्व विरोधकांनी विरोध दर्शऊन विकासालाच विरोध दर्शवला आहे.

शहर विकासाचे स्वप्न साकारतांना आमदार किशोर पाटिल यांची पाचोरा नगर पालिकेला वेळोवेळी साथ असून विरोधकांच्या या भुमिकेमूळे विकास कामांना खिळ बसली आहे. तसेच बाजार समितीत नगरपालिकेचे एक सदस्य प्रतिनिधी म्हणून पाठवणे हा विषय माझ्या अधिकारा नुसार स्थगित करण्यात आला आहे.

विरोधकांनी विरोध नकरता विकासाला साथ द्या असे जाहिर अवाहन मी करतो.

-नगराध्यक्ष संजय गोहिल  

LEAVE A REPLY

*