डुडलव्दारे चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही. शांताराम यांना गुगलची अभिवादन

0
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणून ओळखले जाणारे व्ही. शांताराम यांची आज ११६ वी जयंती. त्यानिमित्ताने गुगलने त्यांना डुडलव्दारे अभिवादन केले आहे.

दो आँखे बारह हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहाणी, झनक झनक पायल बाजे, सेहरा, गीत गाया पथरोने, पिंजरा, अशी ही बनवाबनवी यासारखे मराठी हिंदी दर्जेदार चित्रपट त्यांनी रसीकांना दिले आहेत.

गुगलच्या या डुडलमध्ये व्ही. शांताराम यांचे छायाचित्र दाखिवण्यात आले असून सिनेमाची रिळे व कॅमेरा दाखविण्यात आला आहे. तर बाजुला डफ घेतलेला शाहीर, दो ऑखे बारह हाथ व नवरंग या चिटपटातील चित्रे दाखविण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबर १९०१ मध्ये कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून त्यांनी आपली छाप रसीकांच्या मनावर उमटवली आहे.

बाबुराव पेंटर यांच्या मालकिच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून सुरूवात करत १९२१ मधील सुरेखा हरण या मूकपटात त्यांनी सर्वप्रथम अभिनय केला. चित्रपट निमिर्तीचे तंत्र आत्मसात करत १९२५ मध्ये त्यांनी सावकरी पाश या चित्रपटात तरूण शेतकर्‍याची भूमिका केली.

१९२७ मध्ये नेताजी पालकर या पहिला मूकपट त्यांनी दिग्दर्शीत केला. प्रभात चित्र फिल्ममधून बाहेर पडत त्यांनी परेल येथे महात्मा गांधी उद्यानाजवळ राजकमल स्टुडीओची उभारणी केली. वडील राजाराम व आई कमल यांच्या नावातून त्यांनी राजकमल हे नाव दिले.

LEAVE A REPLY

*