रेल्वेस्थानक परिसरात विक्रेत्यांना शासकीय कार्यालयाचे अभय

0

जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-महानगरपालिकेतर्फे गेल्या तीन दिवसापासून नो हॉकर्स झोनमध्ये अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई सुरु आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील तालुका प्रशासकीय इमारतीत विक्रेत्यांच्या टपर्‍या आणि साहित्य ठेवत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली.

दरम्यान टपरीसह साहित्य जप्त करुन टॅक्टरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न करताच संबंधित विक्रेत्याने अधिकारी आणि पोलीसांच्या नाकावर टिचून साहित्य परत नेले. यावेळी परिसरात गोंधळ होवून तणाव निर्माण झाला होता.

बळीरामपेठ सुभाष चौक, शिवाजीरोड यासह नो हॉकर्स झोन परिसरात अतिक्रमीत जागांवरील हातगाड्या जप्त करुन जेसीबीच्या सहाय्याने चक्काचूर करण्यात आल्या.

आज सकाळी शाहूनगरातील ट्रॉफिक गार्डन परिसरात देखील कारवाई करण्यात आली. सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात तालुका प्रशासकीय इमारतीत येथील विक्रेते टपर्‍या आणि साहित्य ठेवत असल्याची माहिती मनपा प्रशासनाला मिळाली.

त्यानुसार सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तासह मनपा अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले होते. इमारतीत एक टपरी आणि लोखंडी बाक तसेच इतर साहित्य ठेवलेले दिसून आले.

हे सर्व साहित्य जप्त करुन टॅक्टरमध्ये ठेवण्यात आले. परंतु संबंधित टपरीधारकांनी मनपा अधिकारी आणि पोलीसांच्या नाकावर टिचून हे सर्व साहित्य परत घेतले.

त्यामुळे महापालिकेकडून होणार्‍या कारवाईत भेदभाव होत असल्याची चर्चा परिसरात रंगत होती. कार्यालयातूनच विज घेतली असल्याची चर्चा सुरु होती.

परिसरात तणाव
टपरीसह साहित्य जप्त केल्यानंतर संबंधित विक्रेत्यांनी साहित्य घेवून जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे गोंधळ होवून परिसरात तणाव निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

*