पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निसर्ग लेखिका वीणाताई गवाणकर

0
जळगाव | दि.१७ :    जळगाव येथे दि. १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ चरित्र आणि निसर्ग लेखिका सौ. वीणाताई गवाणकर यांची निवड
करण्यात आली आहे.

या साहित्य संमेलनाचे आयोजन वसुंधरा महोत्सवाला जोडून करण्यात आले असून समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे. तर जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कृत केले आहे.

सौ. वीणाताई गवाणकर यांचे नाव ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या लिखाणातून साहित्य जगतात पुढे आलं, त्यानंतर डॉ. आयडा स्कडर, सर्पतज्ञ रेमण्ड डिट्मार्स, पक्षीतज्ञ डॉ. सालेम अली, महान क्रांतीकारक आणि कृषीतज्ञ डॉ. खानखोजे, जलतज्ञ विलासराव साळुंके यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तके लिहीली. डॉ.गवाणकर सातत्याने वर्तमानपत्र आणि
मासिकांमध्ये लिखाण करतात. कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रात व्यापक कार्य करणाऱ्या
मान्यवर तज्ञांच्या चरित्रावर आधारित ललित लेखन आपल्या अत्यंत विलक्षण शैलीने त्या करतात.

त्यांना तीनवेळा महाराष्ट्र शासनाच्या वाड:मय पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य
परिषदेचा धनंजय किर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रालयाचा कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार इ.
पुरस्कारांसह २०१४ मध्ये एस.एन.डी.टी.विद्यापीठातर्फे वुमन ऑफ द इअर पुरस्कार मिळाला आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

पर्यावरण साहित्य संमेलनाचा समारोप विज्ञाननिष्ठ लेखक आणि किल्यांचे अभ्यासक प्र.के. घाणेकर
समारोप करणार आहे. त्याचप्रमाणे या संमेलनामध्ये पर्यावरण आणि ‘निसर्ग साहित्याचा लोकजागरण,
पर्यावरण चळवळ आणि शासनाच्या धोरणावर पडणारा प्रभाव’ या विषयावर परिसंवाद आयोजित
करण्यात आला आहे.

या परिसंवादामध्ये डॉ. वरद गिरी (बंगलोर), श्री. संतोष गोंधळेकर (पुणे), डॉ. सुरेश  चोपणे (पुणे), प्रा. विद्याधर वालावलकर (ठाणे) सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे ललित लेखन,  स्तंभलेखन आणि वर्तमान पत्रातील लेखन, संशोधन आणि पेपर सादरीकरण, समाजमाध्यम (सोशलमिडीया) या चार गटात चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रातून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन  चळवळ कशी गतिमान होऊ शकेल, याविषयी विचार विनिमय केला जाणार आहे.

साहित्य संमेलनाच्या  प्रभावी आयोजनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या संयोजन समितीमध्ये श्री. राजेंद्र नन्नवरे, श्री. किरण सोहळे,  अर्चना उझागरे, श्री. उमेश इंगळे, श्री. सुरेंद्र चौधरी, श्री मिलिंद भारंबे यांचे सह साहित्य क्षेत्रातील श्री.
अशोक कोतवाल, श्री. अशोक कोळी, श्री. मामा धुप्पड, श्री. चंद्रकांत भंडारी, श्री. मनोज गोविंदवार, प्रा.
तुषार चांदवडकर, श्री. गिरीश कुलकर्णी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*