‘महाराणी पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती द्या : जामनेर राजपूत समाजबांधवाचा विराट मोर्चा

0
जामनेर | | प्रतिनिधी : दिग्दर्शक संजय भंसाली यांच्या राणी पद्मावती या चित्रपटातुन महाराणीचा अपमान करणारे चित्रीकरण करण्यात आले असुन संपुर्ण हिंन्दु समाजाला लाजविण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातुन स्वत:हचा धंदा कसा वाढेल यासाठी त्याने इतिहासाचे चुकीचे चित्रीकरण केलेले आहे.

त्यामुळे राजपुत समाजाचाच नव्हे तर संपूर्ण हिंन्दु समाजाचा भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे दिग्दर्शक भंसाली यांचा निषेध करुन ह्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात यावे या मागणीसाठी जामनेर राजपुत समाज व सर्व हिंन्दु बांधवांतर्फे तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा नेऊन तहसिलदार नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराणी पद्मावती या देशाचा त्याग, बलिदान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. हिंन्दु संस्कृतीची अब्रु वाचविण्यासाठी या देवीने प्रखर अग्निकांडात उडी घेऊन जोहार केलेला आहे. अशा या राणीचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. म्हणुन चित्रपट प्रदर्शीत करण्यापूर्वी समितीच्या सदस्यांना दाखविण्यात यावा.

त्या शिवाय प्रदर्शित करु नये. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविणारे चित्रीकरण असेल तर ते काढुन टाकण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडु असा इशारा ही देण्यात आला.

मोर्चात प.स. माजी सभापती नवल पाटील, शंकर राजपुत, प.स. सदस्या रुपाली पाटील, संगिता परदेशी, अनिता पाटील, कविता चौधरी, चारुबाई पाटील, साधना पाटील, छायाबाई पाटील, डी.एस. पाटील, रमेश राजपूत, रतन परदेशी, दामोदर पाटील, जालमसिंग राजपूत, राजेश पाटील, शुभम राजपूत, संजय गरुड, डिगंबर केशव पाटील, एस.टी. पाटील, प्रल्हाद बोरसे, किशोर राजपूत, जे.के. चव्हाण, राजु राजपूत यांचेसह शेकडो महिला, पुरुष सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*