स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या : डॉ.राधेशाम चौधरी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  शहरात सर्वत्र घाणीचे साम्राजय पसरले असल्याने साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरीया यांच्या रुग्णांच्या संख्या देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले.

जळगाव फर्स्टतर्फेआरोग्य बाबाज जनजागृती अभियानांतर्गत त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर त्रिमूर्ती संस्थेचे संस्थापक प्रा. मनोज पाटील, प्राचार्य. प्रा. तारे उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. चौधरी म्हणाले की, डासांचे जीवनचक्र, त्यांचा प्रसार व प्रादुर्भाव कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या आजारापासून वाचण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी या वरील उपाययोजनान बाबत डॉ. चौधरी यांनी विस्तृत माहिती दिली.

तसेच साथीच्या आजारांची लक्षणे कशी ओळखणे, डासांची उत्पत्ती रोखणे ,डास प्रतिबंधक फवारणी, या बरोबरच डासां संरक्षण कश्या प्रकारे करता येईल. वत्याच्या नियंत्रणासाठी कोणते माध्यम प्रभावी ठरु शकते. याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षीकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाणीच्या साम्राज्यामुळे डासांची उत्पत्ती

शहरात मनपाकडून समाधानकारक साफसफाई होत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसलेले असल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे शहरात स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. राधेशाम चौधरी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*