भाजपकडून सत्तेचा गैरवापर – शरद पवार

0
मुंबई/नागपूर |  वृत्तसंस्था : मोदी सरकारला राहुल गांधीची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळेच राजीव गांधी यांच्या काळातील ङ्गायली बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंगˆेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. चंद्रपूर येथील जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या ङ्गाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता त्यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळेच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे असा आरोपही अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

सध्याचे सरकार सत्तेचा गैरवापर करत असून आकसाचे राजकारण सुरू असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.
इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर ६ महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत असेही पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

*