जि.प.च्या 66 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

0

जळगाव । दि. 16 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल दि.15 रोजी जि.प.तील सर्व विभागांना अचानक भेटी दिल्या होत्या.

अचानक भेटीमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. या भेटीदरम्यान पुढील तारखेची आगाऊ स्वाक्षरी करणार्‍या 10 व कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणार्‍या 56 कर्मचार्‍यांना सीईओंनी आज कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सीईओ यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना भेटी देवून याठिकाणच्या कामाचा आढावा घेतला होता. या भेटी दरम्यान सीईओ यांनी सर्व विभागाच्या कार्यालयीन हजेरीपटांची अचानक तपासणी केली होती.

यात आरोग्य विभागातील 5, ग्रामपंचायत-2, शिक्षण-1, अर्थ विभागातील 2 अशा 10 कर्मचार्‍यांनी हजेरीपटावर पुढील तारखेची आगाऊ स्वाक्षरी केल्याचे दिसून आले.

तसेच कार्यालयीन वेळेत गैरहजर असलेल्या अर्थ विभागातील 2, सामान्य प्रशासन विभाग-2, आरोग्य विभाग-1, बांधकाम विभाग-15, ग्रामपंचायत विभाग-6, लघुसिंचन-4, ग्रामीण पाणी पुरवठा -5, पशुसंवर्धन-2, प्राथमिक शिक्षण-19 अशा एकूण 66 कर्मचार्‍यांना सीईओ यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

LEAVE A REPLY

*