शिवसेनेचा कृषी अधिक्षकांच्या दालनात दोन तास ठिय्या

0

जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-बोगस बीटी बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान कृषी अधिक्षकांच्या आश्वासनानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.

कापसाचे बीटी बियाणे बोंडअळीच्या प्रादुर्भावाला सक्षम असल्याची बतावणी करून कंपन्यांकडुन हजारो शेतकर्‍यांची फसवणुक केली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

या फसवणुक झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधीत कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांना घेराव घालुन दोन तास ठिय्या आंदोलन केले.

कारवाईच्या मागणीवर शिवसेना ठाम
जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी जिल्ह्यातील 23 कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना सांगितले.

मात्र प्रत्यक्षात कारवाई करावी या मागणीवर चंद्रकांत पाटील व शिवसैनिक ठाम होते. त्यामुळे कृषी अधिक्षकांनी कारवाईचे लेखी आश्वासनही दिले.

LEAVE A REPLY

*