करमाड बु येथे पाण्याची टाकी फुटल्याने ढिगाऱ्याखाली दाबुन 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

0
 पारोळा | तालुक्यातील करमाड बु येथे  विटभट्टिच्या कामासाठी बाधण्यात आलेल्या निकृष्ठ दर्जाची टाकी कोसळल्याने येथील १७ वर्षीय मुलाच्या अंगावर पडल्याने त्याचा ढिगाऱ्याखली दाबुन मृत्यू झाल्याची घटणा घडली.
   कैलास जाधव हे गुलाब जालम पाटील यांच्याकड़े आले असता त्याचा मुलगा कांतिलाल गुलाब पाटील वय 17 याला कामानिमित्त त्याच्या शेतातील विटभट्टच्या ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी मागील 15 दिवसांपूर्वी 8 फुट ऊंच पाण्याची टाकी बाधन्यात आली होती. तेथे कांतिलाल हा पाणी पित असताना अचानक पाण्याची फुटल्याने टाकी त्याच्या अंगावर कोसळली. तो सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला व त्याचा जागिच मृत्यू झाला.
त्यास उपस्थित नागरिकांनी ढिगाऱ्या खालूंन काढले पण त्याचा मृत्यू झाला होता. सदर ही पाण्याची टाकी गेल्या 15 दिवसांपूर्वी बंधण्यात आली होती तिचे काम निकृष्ठदर्जाचे होते म्हणूनच ती कोसळळी व माझ्या निष्पाप मुलाचा बळी गेला असा आरोप कांतिलालच्या वडिलांनी केला आहे.
  गुलाब जालम पाटील यांच्या फिर्यादिवारुंन सुभाष ठाकुरसिंग जाधव, प्रकाश ठाकुरसिंग जाधव, सुनील सुभाष जाधव, कैलास ठाकुरसिंग जाधव ह्या चारही जणांविरुद्ध पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे
  कांतिलाल हा गुलाब पाटील याचा एकुलता एक मुलगा होता त्याला सैन्यत जाण्याची फार आवड़ म्हणून एन सी सी च्या माध्यमातून आपन सैन्यात दाखल होऊ म्हणून त्याने 10 पास झाल्यानंतर  पारोळा येथिल महाविदयातल्यात प्रवेश न मिळाल्याने एन सी सी करीता त्याने धरंणगाव येथिल महाविद्यालयत 11वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता.

LEAVE A REPLY

*