न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून कत्तलखाना पुन्हा सील

0

दोंडाईचा । दि.15 । प्रतिनिधी-येथील सन 123 मधील अद्यावत मशिनरी युक्त कत्तलखाना अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा सिल करण्यात आला असून पालिकेचे मुख्याधिकारी दीपक सावंत हे सकाळी आपल्या कर्मचार्‍यांना घेऊन मोहम्मदिया नगरमधील सन 123 मध्ये पालिकेने बांधलेल्या कत्तलखान्यात गेले.

त्याठिकाणी असलेल्या सर्व साहित्याची पाहणी करून कत्तलखान्यात जाणारे सर्व मार्ग आहे. त्या स्थितीत सिल केले, कत्तलखाना चालकांनी न्यायालयाच्या आदेशानंतर येथील सर्व मांस बाहेर पाठवून दिले होते.

याठिकाणी काम करणार्‍या जवळपास 100 कर्मचाऱयांना आपल्या सामानासह बाहेर काढून पंचनामा करून कत्तलखाना सिल केला सन 2010 पासून कत्तलखाना च्या बाबतीत अनेक पक्ष आणि संघटना यांचा विरोध झुगारून तत्कालीन सत्ताधारी गट असलेल्या डॉ. हेमंत देशमुख गटाने हा कत्तलखाना उभारला होता तब्बल 7 वर्षाच्या लढ्यानंतर आणि खरं म्हणजे पालिकेत झालेल्या सत्तांतर नंतर दोंडाईचा शहरातील हा अद्यावत मशिनरी युक्त कत्तलखाना बंद झाला आहे.

कत्तलखाना सिल करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक सावंत, उपमुख्याधिकारी शिवाजी मराठे, अभियंता जगदीश पाटील, विद्युत विभाग प्रमुख विजय तावडे, किशोर सोनार, वासुदेव रडे यांच्या समक्ष तर अकबर युसूफ अली, सय्यद उस्मान गुलाम, अझहर शेख सलीम, डॉ. चंद्रकांत शेळके या पंचाच्या साक्षीने कत्तलखाना सिल करण्यात आला यावेळी पालिकेचे विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक देखील उपस्थित होते

आठवड्यात 650 जनावरांची होत होती कत्तल
दरम्यान याठिकाणी काम करीत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत शेळको यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की तापी व्हॅली ने चालविण्यासाठी घेतलेल्या या कत्तलखान्यात दर आठवडयाला 650 भाकड जनावरांची कत्तल केली जात होती. प्रत्येकी जनावरांचे मांस हे 100 किलो प्रमाणे 6500 किलो मांस आठवड्यात उत्पादित करून सदर मांस बेळगांव येथे पाठविले जाते त्याठिकाणी 1 किलो अर्धा किलो चे पॅकिंग तयार करून परदेशात हे मांस पाठविले जाते दोंडाईचा येथील कत्तलखाण्याची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात होती.

LEAVE A REPLY

*