रणछोडनगरमध्ये अल्पबचत अधिकार्‍याच्या घरात भरदिवसा चोरी

0

जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-शहरातील रणछोडनगरमधील रहिवाशी असलेले अल्पबचत अधिकारी यांचा बंद घराचा भरदिवसा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी घराच्या कपाटातील 10-15 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेल्याची घटना दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत प्रत्यक्षदर्शींंकडून मिळालेली माहिती अशी की, रणछोड नगरमधील अनंत लक्ष्मण कळस्कर हे अहमदनगर येथे अल्पबचत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

त्यांच्या पत्नी मिनाक्षी कळस्कर हया सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अनंत कळस्कर हे नोकरीनिमित्त नगर येथे असल्याने तसेच त्यांच्या पत्नी दुपारी शाळेत गेल्या असल्याने त्यांचे घर सकाळी 11.30 वाजेपासून बंद होते.

त्यांचा मुलगा अमित सकाळी कॉलेजला व दुपारी कामावर गेला होता. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरटयांनी घराच्या बाजुच्या भिंतीवरुन अंगणात उड्या मारल्या. त्यानंतर चोरटयांनी स्वयंपाक घराजवळील दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सामानही फेकला
घरातील कपाटांमध्ये काहीही मिळून न आल्याने चोरटयांनी घरातील सामान अस्तावस्त फेकला होता. कपाटामधील 10 ते 15 ग्रॅमच्या दोन अंगठया चोरट्यांनी चोरून नेल्या आहे.

मुलगा अमित याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांने आई व वडीलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पीएसआय रोहन खंडागळे व डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

पोलिसांनी तपासले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
अनंत कळस्कर यांच्या घराबाहेर दुपारी दोन इसम बराच वेळ उभे असल्याचे घराशेजारील एका महिलेने सांगितले. दरम्यान कळस्कर यांच्या घरापासून अंतरावर खोंडे यांचे घर असून पोलिसांनी याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
आतून लावली चोरटयांनी

मुख्य दरवाजाची कडी
चोरटयांनी घरात प्रवेश केल्यानंतर चोरटयांनी आतून घराच्या मुख्य दरवाज्यांची कडी लावली. दुपारी 4.30 वाजता त्यांचा मुलगा अमित घरी आला असता, त्याने मुख्य दरवाज्याचे कुलुप उघडले, परंतु दरवाजा आतून लावल्याने उघडू शकला नाही. त्यानंतर त्यांने स्वयंपाक खोलीच्या बाजुने येवून पाहिले असता, याठिकाणचा दरवाजा उघडा दिसला.

बेडरुमचे कुलूप तोडले
अनंत कळस्कर यांच्या पत्नी मिनाक्षी कळस्कर यांनी शाळेत जाण्यापूर्वी बेडरुम खोलीला बाहेरून कुलुप लावले होते. चोरटयांनी हे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुमधील कपाटाला लॉक असल्याने चोरटयासंनी लोखंडी वस्तुच्या साहाय्याने कपाटाचा दरवाजा वाकवून कपाट उघडले.

 

LEAVE A REPLY

*