‘नृत्य मल्हार’च्या राज्यस्पर्धेसाठी ‘अनुभूती’चा संघ ठरला पात्र

0
जळगाव | महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग,  दूरदर्शन,  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने या वर्षांपासून “नृत्य मल्हार” ही आंतरशालेय राज्र्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि दूरदर्शनच्या माध्यमातून शालेय पातळीवर या स्पर्धा घेतल्या जात आहेत. नाशिक विभागातील जिल्हास्तरीय स्पर्धा १९ सप्टेंबरला पार पडल्या

त्यात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन्ही संघानी (लहान गट- इयत्ता ५ वी ते ७ वी आणि मोठा गट इयत्ता ८वी ते १० वी) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत स्थान निश्चित केले होते. विभागीय पातळीवर दोन्ही गटांच्या नृत्य स्पर्धा नाशिक येथे १३ नोव्हेंबरला झाल्या\
त्यात नाशिक,  धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील लहान व मोठा गट मिळून ३० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन्ही गटांनी चमकदार कामगिरी करीत दोन्ही गटांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
हे दोन्ही संघ आता जानेवारी महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नृत्य सादर करणार आहेत. भवरलाल  कांताबाई फाऊंडेशनच्यावतीने दारिद्रय रेषेखालील मुलांसाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल चालवली जाते.

LEAVE A REPLY

*