चला कोण कोण येणार इंदोरच्या सुयश दीक्षितच्या नव्या देशात

0

इंदोर | वृतसंस्था : इजिप्त आणि सुदान या देशांच्या मध्ये असलेल्या नो मॅन लँड वर इंदोरच्या सुयश दीक्षितने आपला हक्क सांगत तेथे चक्क एका नव्या देशाची निमिर्ती केली आहे. किंडगम ऑफ दीक्षित असे त्या प्रस्तावीत देशाचे नामकरण करण्यात आले आहे.

इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक ९०० चौरस मिटरचा बिर ताविल नावाचा मोकळा वाळवंटी प्रदेश आहे. हा प्रदेश नो मॅन्स लँड म्हणून ओळखला जातो. नो मॅन्स लॅड म्हणजे कोणाचीही मालकी हक्क नसलेला भूभाग होय.

किंगडम ऑफ दीक्षित

या प्रदेशावर सुयशने त्याचा हक्क सांगत किंगडम ऑफ दीक्षीत या देशाची निमिर्ती करून या देशाचा राजा म्हणून त्याने स्वत:ला घोषीत केले आहे. तर वडीलांना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करप्रमुख म्हणून जाहीर केले आहे.

राष्ट्रध्वजही तयार अन् मान्यनेसाठी युनोकडे अर्ज दाखल

सुयशने या देशाचा राष्ट्रध्वजही तयार केला आहे. या देशाला जागतीक स्तरावर मान्यता मिळविण्यासाठी त्याने चक्क सयुंक्त राष्ट्र संघाकडे अर्जही सादर केला आहे. या जागेवर त्याने झाड लावले आहे. जर कोणाला हा देश घ्यायचा असेल तर त्याने माझ्याशी युध्द करावे लागेल असेही त्याने आवाहन दिले आहे.

कोणीही होऊ शकते नागरीक

ज्यांना या देशाचे नागरीकत्व हवे असेल त्याने अर्ज करावा. देशाचे नागरीकत्व मिळवण्यासोबतच त्यांना या देशातील अनेक महत्वाची पदेही मिळू शकणार आहेत.

वेबसाईटही तयार

सुयशने या देशाची  https://kingdomofdixit.gov.best या नावाने वेबसाईटही सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

*