कंडारीच्या जुगार अड्ड्यावर धाड : एक लाख चार हजारांच्या मुद्देमालासह नऊ जणांवर कारावाई

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  कंडारी येथी महादेव टेकडी भागातील टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी दि. २१ रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान अचानक कारवाई करुन १ लाख ४ हजारांच्या मुद्देमालासह ९ जणांवर काराई केली. या कारवाईने परिसरात खळबळ माजली.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी गावात सुरु असलेल्या जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन शहर पोलिसांनी अचानक पणे केलेल्या कारवाईत संजय मुरलीधर मोरे (वय ४४, रा. महादेव टेकडी, कंडारी), एट्रो ब्रायन सिमन्स् (वय २७), अनिल प्रकाश सपकाळ, शेख मेहबुब शेख बुडन, रवी तुकाराफ तायडे, संदीप अशोक प्रजापती, अशोक शामराव दमाडे, गौतफ रंगनाथ देवरे, प्रवीण रघुनाथ महाजन यांना पोलीसांनी अटक केली.

या कारवाईत २ हजार ३०० रुपये रोख, पत्ते, ५ हजार रुपयांचे मोबाईल, १० हजार रुपयांचे १० मोबाईल संच यासह जुगाराइतरही साहित्य असे एकूण १ लाख ४ हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पीएअसाय अंगत नेमाने, समाधान पाटील, विशाल मोहे, विजय पाटील, यासिम पिंजारी, बाजारपेठ पो.स्टेे.चे नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, प्रदीप पाटील यांच्या पथकाने उपविभागीय पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मागरदर्शनाखाली केली.

पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अंगत नेमाणे करीत आहे.

LEAVE A REPLY

*