मैत्री : जगण्यातला आनंद…

0

अस म्हणतात, ‘मैत्री’ ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावी सुखात ती हसावी आणि दु:खात ती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

अस का म्हटले जात असेल. आपल्याकडे इतकी सारी नात्यात गुंफलेली माणसे असतांना सुध्दा मित्र-मैत्रिण का हवे असतात? कारण मैत्री हे मनाचे आपल्या हालचालींचे दिलखुलासपणे व्यक्त होणार्‍या आपल्या भावनांचे स्थानक आहे.
एक व्यक्ती एकटा जगात कोठेही फिरू शकतो, हिंडू शकतो परंतु मनसोक्त पणे हिंडावयाचे असेल तर त्याला हवे असते ते मैत्रीतल्या व्यक्तीची साथ.

मित्र-मैत्रिणी समवेत असतील तर व्यक्ती मनमुरादपणे एखाद्या गोष्टीचा आनंद लुटू शकतो.  मैत्री ही जगण्यातला आनंद असतो. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सर्वांचा आवडीचा जिव्हाळ्याचा एक मित्र बनला आहे. तो आपल्याला शिकवतो, हसवतो, रडवतो, गुणगुणायला लावतो. तो आपल्याला आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी, नाते संबंधातील व्यक्ती तसेच इतर व्यक्ती समवेत संभाषण करून देण्याचे काम करतो. होय हा आज अबालवृध्दांपासून सर्वांचाच आपल्या प्रत्येकाचा मित्र बनला आहे. तो म्हणजे आपला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल.

मोबाईल हा आपला असा मित्र आहे की, त्यामुळे आपल्याला विशाल अशा जगातील माहितीचे ज्ञान अवगत करून देत असतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टेलीग्राम, अशा विविध सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून आपल्याला हाच आपला मित्र आपल्या मित्र-मैत्रीणीच्या आयुष्यातील त्यांनी आपल्या समवेत शेअर केलेल्या त्यांचे स्टेटसच्या माध्यमातून त्यांची सद्यस्थिती सांगत असतो.

हाच आपला मित्र आपल्याला पुस्तकांचे भांडार, शॉपिंग मॉल्स, बँक, होटेल, रेल्वे, बस, ट्रॅव्हल्स असे विविध सुविधा पुरवित असतो. म्हणजेच आपली आर्थिक असो वा कुठलीही मोठी समस्या चुटकीसरशी सोडविण्याचे काम हाच आपला मित्र करत असतो.

‘फ्रेंडशिप’डे ला इंग्रजी प्रथेनुसार अनेक मित्र-मैत्रिणी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून साजरे करतात. परंतु त्यापेक्षा ज्या गोष्टींची आपल्या फ्रेंडसला गरजेची आहे, आवश्यकता आहे अथवा उपयोगाची आहे. अशी वस्ती अशी गोष्ट देवून साजरा केला तर तो फ्रेंडशिप डे जरा जास्त आठवणीत राहिल व सार्थकी लागेल.

LEAVE A REPLY

*