असंपदा आढळून आल्याने तत्कालीन औषध निरिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-जळगाव येथे अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन औषध निरीक्षकाकडे 15 लाखांची असंपदा चौकशीअंती आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायदयानुसार तत्कालीन औषध निरीक्षक सुरेशचंद्र अग्रवाल यांच्याविरुध्द जिल्हापेठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेले तत्कालीन औषध निरीक्षक सुरेशचंद जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतांना पत्नीच्या नावाने सन 1992 ते 2011 या कालावधीत पदाचा दुरुपयोग करून गैरमार्गाने उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा असंपदा संपादीत केली.

याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने चौकशीअंती बडतर्फ तत्कालीन औषध निरीक्षक सुरेशचंद जगदीशप्रसाद अग्रवाल यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 19 टक्के अधिक असंपदा पत्नीच्या नावे आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी गोपाळ ठाकुर यांच्या फिर्यादीवरून सुरेशचंद्र अग्रवाल व त्यांच्या पत्नी कंचन अग्रवाल यांच्या विरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुरन 3066/2017 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1)(इ), 13(2) भादवी कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हाचा तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर करीत आहे.

LEAVE A REPLY

*