भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांकडे जबाबदारी

0

जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-आगामी मनपा, विधना सभा आणि लोकसभा निवडणूकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

पक्ष संघटनसाठी आणि महिलांचा जनाधार वाढविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपच्या 51 महिला पदाधिकार्‍यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

जळगाव शहराची भारती बागुल, ग्रामीणसाठी भारती माळी तर नंदुबार जिल्ह्याची डॉ.अस्मिता पाटील आणि धुळे शहर व ग्रामीणची जबाबदारी आ.स्मिताताई वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

आगामी निवडणूकांच्या व्युहरचनेसाठी आणि महिलांचे संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजप प्रदेश महिला मोर्चाची बैठक नुकतीच शेगाव येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

महिला मोर्चाच्या माध्यमातून मंडलस्तरापर्यंतच्या रचना पूर्ण करण्याच्या उद्देशाने तसेच महिला मतदारांना पक्ष संघटनच्या बळकटीकरणासाठी 51 महिला पदाधिकार्‍यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जळगाव शहरची नाशिकच्या भारती बागुल तर ग्रामीणची धुळे येथील भारती माळी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी बेटी बचाओच्या राज्य सहसंयोजिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांच्याकडे आणि धुळे शहर आणि ग्रामीणची जबाबदारी आ.स्मिताताई वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप महिला मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.माधवी नाईक यांनी केली.

LEAVE A REPLY

*