जलयुक्तच्या 609 कामांसाठी 48 कोटींचा आराखडा

0

जळगाव । दि. 14 । प्रतिनिधीशासनाच्या महत्वकांक्षी मानल्या जाणार्‍या जलयुक्त शिवार योजनेच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये सन 2017-18 या वर्षासाठी शिवार फेरीतुन 206 गावांची निवड करण्यात आली आहे.

या गावातील 609 कामांसाठी 48 कोटी रुपयांचा आरारखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या  लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांनी दिली.जलयुक्त शिवार योजनेच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये सन 2017-18 या वर्षाचे सात महिने उलटून देखील जीएसटीमुळे कामांना अद्याप सुरवात झालेली नाही.

जलसंधारण विभागाचे सचिव यांनी दिलेल्या सुचनेवरून सन 2013-14 च्या रेटनुसार 12 टक्के जीएसटी लावून निविदा तयार करण्याचे काम सुरु आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत या सर्व कामांच्या निविदा काढण्यात येणार आहे.

जुन 2018 अखेरपर्यंत ही 609 कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यात 332 कामे दुरुस्ती असून 277 कामे सिमेंट नाला बांधणेसाठीची आहे.

आराखडानुसार सर्वाधिक कामे जामनेर तालुक्यात तर सर्वात कमी कामे अमळनेर तालुक्यात करण्यात येणार आहे. शिवार फेरीतुन निश्चित करण्यात आलेल्या 206 गावांमधील 609 कामांसाठी 47 कोटी 99 लाख 85 हजार रुपयांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील 5554 कामांसाठी सव्वाशे कोटींचा आराखडाजलयुक्त शिवार योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात कृषी, सिंचन, भुजल विभाग व वन विभागामार्फेत करण्यात येणार्‍या एकूण 5554 कामांसाठी सव्वाशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात लघुसिंचन विभागामार्फेत 609 कामांसाठी 47 कोटी 99 लाख, कृषी विभागामार्फेत राबविण्यात येणार्‍या 3 हजार 242 कामांसाठी 51 कोटी 70 लाख, भुजल विभागामार्फेत 384 कामांसाठी 2 कोटी 49 लाख व वन विभागामार्फेत  राबविण्यात येणार्‍या 399 कामांसाठी 16 कोटी 50 लाख अशा एकूण 5554 काकामांसाठी सव्वाशे कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

तालुका कामांची संख्या दिला जाणारा निधी    यावल 12 1 कोटी 58 लाख    भडगाव 43 4 कोटी 35 लाख    अमळनेर 15 1 कोटी 70    जामनेर 169 5 कोटी 81 लाख    धरणगाव 18 1 कोटी 18 लाख    चोपडा 24 99 लाख    रावेर 29 1 कोटी 80 लाख    मुक्ताईनगर 22 1 कोटी 90 लाख    बोदवड 45 5 कोटी 16 लाख    भुसावळ 29 4 कोटी 58 लाख    चाळीसगाव 63 4 कोटी 82 लाख    पाचोरा 59 6 कोटी 21 लाख    पारोळा 18 2 कोटी 87 लाख    एरंडोल 26 2 कोटी 62 लाख    जळगाव  37 2 कोटी 1 लाख    एकूण 609 47 कोटी 99 लाख

LEAVE A REPLY

*