मनपातून फाईल गहाळ होत असल्याने सीसीटीव्ही यंत्रणेची शिफारस

0

जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-महानगरपालिकेत नगररचना विभागासह अन्य विभागांमध्ये फाईल गहाळ होत असल्याने दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नगररचना विभागासह सर्व विभागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करावी, अशी शिफारस महापौर ललित कोल्हे यांनी विद्युत विभागाकडे केली आहे.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून अनेकवेळा फाईल गहाळ झाल्याच्या घटना पुढे आलेल्या आहेत. तसेच जन्म-मृत्यू विभागात देखील काही रजिस्ट्रर गहाळ झाल्याने दाखले मिळण्यास विलंब होत आहे.

मनपा इमारतीतील काही विभागातून कागदपत्र देखील गहाळ होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याने तसेच तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे नगररचना विभागासह सर्वच विभागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करुन महापौर आणि आयुक्तांच्या दालनात नियंत्रण ठेवण्याची शिफारस महापौर ललित कोल्हे यांनी विद्युत विभागात दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत केल्यास कार्यालयीन कामकाजात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*