जिल्हा बँकेच्या तोट्यातील10 शाखा बंद करण्याचा निर्णय

0

जळगाव । दि. 13 । प्रतिनिधी-ठेवी कमी असलेल्या व 50 व्हावचरपेक्षा कमी व्यवहार असलेल्या जिल्हा बँकेच्या तोट्यातील 10 शाखा बंद करण्याचा धाडसी निर्णय आज संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखा बंद करण्याबाबत चर्चा झाली.

तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात देखील अशा शाखा बंद करण्याबाबत अनेकदा विषय मांडले गेले. मात्र निर्णय घेतला जात नव्हता.

आज संचालकांच्या सहमतीनुसार 249 शाखांपैकी तोट्यात असलेल्या 10 शाखा बंद करुन त्या जवळच्या शाखांमध्ये विलिन करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.

अशा आहेत बंद होणार्‍या 10 शाखा
बंद करण्याचा निर्णय झालेल्या 10 शाखांमध्ये अमळनेर तालुक्यातील मांडळ, भडगाव तालुक्यातील कोठली, झुरखेडा, ता.धरणगाव, गोरगावले ता.चोपडा, वरखेड ता.चाळीसगाव, रिंगणगाव ता.एरंडोल, तळेगाव आणि हिवरखेडा, ता.जामनेर, शिरसमणी ता.पारोळा, राणीचे बांबरुड ता.पाचोरा या शाखांचा समावेश आहे. या शाखांमध्ये ठेवी देखील कमी असून 50 व्हावचरपेक्षा कमी व्यवहार होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*