शेतकर्‍यांची कर्जमाफी महिनाभर लांबणार

0

जळगाव । दि. 13 । प्रतिनिधी-शासनाने शेतकरी कर्जमाफीसाठी अपलोड झालेल्या 1 ते 66 रकान्यांची सीडीच रद्द करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. या आदेशामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफीची प्रक्रिया आणखी महिनाभर लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून 1 ते 66 रकान्यांच्या आधारे माहिती मागविली होती. ही माहिती वि.का. सोसायट्यांच्या सचिवांमार्फत मागविण्यात आली होती.

याबाबतची सीडी देखील सहकार विभागामार्फत शासनाला सादर करण्यात आली होती. दरम्यान आज मुंबई येथे जिल्हा बँकांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 1 ते 66 रकान्यांची सीडीच रद्द करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याची माहिती सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

त्यामुळे आता नव्याने माहिती मागविण्यात आली असून ही माहिती गोळा करण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवस कालावधी लागणार असल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणे देखील आणखी महिनाभर लांबणार आहे.

 

LEAVE A REPLY

*