मोठ्या तलावांसाठी विशेष प्रस्ताव सादर करा : जलयुक्त शिवार आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0
जळगाव |  प्रतिनिधी :  मोठ्या तलावांसाठी तातडीने विशेष प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.

जलयुक्त शिवार कामांची पाहाणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य जिल्हा दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर जलयुक्त शिवार आढावा बैठक घेण्यात आली.

तसेच जलसंधारण मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत नुकत्यांच जिल्ह्यात झालेल्या आढावा बैठकीच्या इतिवृत्तच्या अनुषंगाने या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तिसर्‍या टप्यातील ज्या गावांचे आराखडे अद्याप प्राप्त झालेला नसतील अशा गांवाचे आराखडे येत्या दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश यावेळी उपस्थितीना दिले.

आराखडे घेताना वस्तुनिष्ठ आरखडे स्वीकृत करावे. हे आरखडे उप विभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी त्यांच्या स्तरावर खात्रीकरुन घ्यावेत. जून पूर्वी कामे पूर्ण होतील यांची दक्षता घ्यावी. जलयुक्त शिवार कामांसाठी आवश्यक असलेली वाळू संबधी उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शन नियंत्रणखाली उपलब्ध करुन घ्यावी जेणे करुन हे कामे वेळेत पूर्ण करण्यास अडसर निर्माण होणार नाही.

मोठ्या तलावांची कामे करण्यासाठी विशेष प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना निंबाळकर यांनी यावेळी बैठकीत संबधितांना दिल्या.

लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्याबाबत कार्यवाही अहवाल, थर्ड पार्टी ऑडीट अहवाल, उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी सर्व आमदार महोदयांना सादर करावा अशा सूचना दिल्या.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी, पाचोरा मनिषा खत्री, जळगाव उपवनसरंक्षक आदर्शकुमार रेड्डी, यावल उप वनसरंक्षक संजय दहिवले. जिल्हा कृषी अधिक्षक तथा सदस्य सचिव विवेक सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कुटे आदि अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*