रामानंद नगर पोलीस चौकीजवळील चार दुकानांमध्ये चोरी

0

जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-शहरातील रामानंद नगर पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेली चार दुकाने मध्यरात्री चोरटयांनी फोडल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलिस चौकीपासून जवळच असलेल्या स्टॉपवर प्रतिभा पाटील यांच्या मालकीचे प्रतिभा साडी सेंटर दुकान आहे.

चोरटयांनी या दुकानाचा टॉमीच्या साहाय्याने कडी कोयंडा तोडून दुकानातील 800 रुपये रोख व दोन साडया असा मुद्देमाल चोरून नेला.

तसेच चोरटयांनी शेजारील सुजाता कुळकर्णी यांच्या मालकीचे अविशा बुक डेपो, अतुल बोरसे यांचे कमल मेडिकल व डॉ. मिलींद समनपुरे यांच्या मालकीचे शिवम क्लिनीक या तिन्ही दुकानाचे मध्यरात्री शटरचे कुलुप तोडून चोरटयांनी दुकानात प्रवेश केला.

परंतु चोरटयांना तिघे ठिकाणी काहीही मिळून आले नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला.

त्यांनी याबाबत रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
रामानंदनगर पोलिस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या भरचौकातील चार दुकाने मध्यरात्री चोरटयांनी फोडली. यातील एका दुकानातून 800 रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. भरचौकातील चार दुकाने फोडून चोरटयांनी पोलिसांना आव्हान दिले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*