शेतकर्‍यांची काळजी घ्या!

0

नागपूर । दि.11 वृत्तसंस्था-जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही सरकारचीच जबाबदारी आहे, असे म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले.

नागपूरमध्ये अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नायडू म्हणाले, आता शेतकरी स्वतःला संघटीत करत असून, ते त्यांच्या रास्त मागण्यासाठी आंदोलने ही करत आहेत. मात्र, हे आंदोलन अहिंसक असायला हवे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.

संसदेमध्ये शेतीवर चर्चा झाल्यास माध्यमे कधीच त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, संसदेत कोणी धुडगूस घातला, तर माध्यमांमधून त्याची चर्चा होते. माध्यमांनी शेती आणि ग्रामीण विषयांना प्राधान्य द्यायला हवे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*