यावल-भुसावळदरम्यान रस्तालूट

0

यावल । दि.11 । प्रतिनिधी-भुसावळ-यावल रस्त्यावर जळगावहून रात्री घरी येतांना सोन्या-चांदीच्या व्यापार्‍याचा पाठलाग करून तीन मोटारसायकलीवरील 6 चोरट्यांनी व्यापार्‍यास चालु गाडीवरून लोखंडी सळईने पाठीत वार करून त्याच्या ताब्यातील सोन्याची बॅग हिसकावून सुमारे 13 ते 15 लाखांचे सोने घेवून चोरट्यांनी पुन्हा व्यापार्‍यास बदडून यावलकडेच पोबारा केल्याची घटना दि.11 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अंजाळे घाटात घडली.

यावल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी अभय देवरे उर्फ पिंटू सोनार यांचे सासरे रमेश शेठ जाधव हे त्यांच्या बुलेट मोटारसायकलवर जळगाहून सोन्या-चांदीचे दागिने तयार करून भुसावळ मार्गे यावलकडे येत असतांना रात्री 9 वाजेच्या सुमारास अंजाळे घाटाजवळ आले असता मागाहून तीन मोटारसायकलवरील सहा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या पत्नीवर लोखंडी सळईने मार दिले असता त्यांनी आपल्या ताब्यातील वाहन थांबविले तीन्ही मोटारसायकलस्वारांनी रमेश जाधव यांना घेरले.त्यांच्या पाठीवर, पायावर जबर मारहाण केली.त्यांच्या ताब्यातील बॅग हिसकावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकीलवर रात्री यावलकडेच चोरटे रवाना झाले.रमेश जाधव यांनी अंजाळे घाटातूनच त्यांचे जावाई अभय देवरे यांना यावल येथे भ्रमणध्वनीवरून कळविले.

बॅगेमध्ये साडे चारशे ते पाचशे ग्रॅम सोन्याचे दागिने 13 ते 15 लाखांचे चोरट्याने घेवून पसार झाले.तर अभय देवरे, यावल न.पा.गटनेते राकेश कोलते, धिरज महाजन, राजन महाजन, भुषण नेमाडे, हे मोटारसायकलीनेच घटनास्थळी अवघ्या 10 मिनिटात जाण्यासाठी निघाले तो पर्यंत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी तात्काळ पोलीसांना संपर्क साधला असता अवघ्या 15 मिनिटात यावलचे पिएसआय अशोक अहिरे व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.तर रमेश जाधव यांना जखमी अवस्थेत भुसावळ येथे खाजगी दवाखान्यात औषधी उपचारासाठी हलवले.

यावल पोलीस स्टेशनमध्ये 30 ते 35 पोलीस कर्मचार्‍यांची जागा रिक्त असून वारंवार जिल्हा पोलीस अधिक्षककांडे शांतता कमेटीच्या मिटींग मधून मागणी करून यावल पोलीस स्टेशनला स्टॉफ पुरवला जात नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी यावल तालुका असल्याने चोरट्यांना सातपुड्यात पळून जाण्यास हावते.अंजाळे घाटात पोलीस चौकीवर कर्मचारी दिसत नाही.

यावल पोलीस अंतर्गत वाढलेल्या घरफोड्या, दंगली, गुन्हे, घात, अपघात याचा विचार करूनही पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी आता तरी पोलीस कर्मचारी वाढवावा व अंजाळे झालेल्या रस्तालुटारूनां जेरबंद करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*