बारा वर्षीय बालिकेचा डेंग्यूमूळे मृत्यू

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-शहरात डेंग्युंचा फैलाव प्रचंड प्रमाणात होत असल्याने त्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यूने शहरात 5-6 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान आज पिंप्राळ्यातील आनंद मंगल नगरातील एका बारावर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली.

शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापर्यंत डेंग्यूने गेल्या तीन महिन्यात 5-6 जणांचे बळी घेतले आहे.

दरम्यान आज शहरातील पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल नगरातील एका 12 वर्षीय बालिका ही दि. 30 आक्टोंबर रोजी तापाने आजारी पडली होती.

या बालिकेला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू बालिकेची प्रकृती अधिकच खालावल्याने दि. 2 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते.

उपाचार घेत असतांना त्या बारा वर्षीय बालिकेचा दि. 10 रोजी दुर्देवी मृत्यू झाला. बारा वर्षीय बालिकेचा मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

या बालिकेचे वडील हे एका खाजगी शाळेत शिक्षक असून त्यांच्या पत्नी पिप्रांळा परिसरात इग्लिश स्कूल चालवितात. तसेच या बालिकेचा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

शहरासह जिल्ह्यात साथीचे आजार पसरले असून डेंग्यूने तर या आठवड्यात कहरच केला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*