नातेवाईकांच्या भेटीमुळे कैद्यांमध्ये आनंद

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अनेक समस्यांना समोरे जावे लागत असते. परंतू कारागृह प्रशासनाने आयोजीत केलेल्या गळाभेट कार्यक्रमात कैद्यांनी आपल्या नातेवाईकांना भेटल्यामुळे कैद्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

जिल्हा कारागृह प्रशासन आणि आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहात गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंदीवान आणि कुटुंबातील सदस्य यांच्या गाठीभेट घडवून आणल्या गेल्या.

जिल्हा कारागृहाने आयोजीत करण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात करण्यात आलेला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलिस महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.

तर व्यासपीठावर कारागृह अधिक्षक सुनिल कुंवर, संस्थेच्या अध्यक्षा शिलांबरी जमदाळे उपस्थित होत्या. कैद्यांना मार्गदर्शन करतांना अप्पर पोलिस महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, बंदीवान यांच्यात नैराश्याची भावना येवू नये, त्यांच्या मनात गुन्हेगारी भावना येऊ नये, म्हणून गळाभेट कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे शासनाचे आदेश आहेत.

बंदीवान यांचे पुनर्वसन, सुधारणा हा त्यामागे हेतू आहे. बंदी हा समाजापासून तुटू नये, तो समाजाशी जुडला असावा तसेच मनावता,करूणा ही भावना ठेऊन बंदींच्या मनाला नैराश्याने शिवू नये, हे कार्यक्रमाचे उद्दीष्ट असल्याचे अधिक्षक सुनील कुंवर यांनी व्यक्त केले. यावेळी पोलिस कर्मचारी व कैद्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*