‘बेटी बचाव बेटी पढाओ’साठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-जैन इरिगेशनतर्फे समाजोपयोगी विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येत आहेत. हनुमंतखेडा येथे ‘भ्रूणहत्या’ व ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

पाणी वाचवा पाणी जिरवा, वृक्ष तोड थांबवा, वृक्षारोपण, भ्रूणहत्या व बेटी बचाव बेटी पढाओ या विषयांवर गावकर्‍यांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जैन इरिगेशनतर्फे प्रबोधन करण्यात आले.

जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मानव संसाधन विभागातर्फे राबविण्यात आले.

हनुमंतखेडा येथे हरिभक्त परायण ऋषीकेश जोशी महाराज यांनी भ्रूणहत्या आणि पाणी बचतीचा संदेश कीर्तनातून दिला. अशा संवदेनशील विषयाबाबत समाजाने जागृत राहण्याची गरज असल्याचे सांगत वारकरी संप्रदायातील अनेक अभंगांचे त्यांनी दाखले दिले.

ऋषीकेश महाराज यांना ललित सूर्यवंशी आणि विनोद जाधव यांनी साथसंगत दिली. याप्रसंगी हनुमंतखेडा येथील सरपंच आबा पाटील यांनी जैन इरिगेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच या उपक्रमांमुळे प्रेरणा मिळत असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*