धरणगाव न.पा.सभागृहात नानासाहेब धर्माधिकारी यांंच्या प्रतिमेचे अनावरण

0
धरणगाव, |  प्रतिनिधी :  सद्गुरु जीवनात परिवर्तन घडवून आणतात. त्यांच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होते. श्री सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांनी अनेकांना सन्मार्ग दाखविला, त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. शिस्त, समर्पण आणि निस्वार्थ सेवा ही समर्थ बैठकीची व्यापक भुमिका आहे.

अशा महनीय व्यक्तीचे सतत स्मरण होत रहावे यासाठी धरणगाव न.पा. सभागृहात त्यांची प्रतिमा लावली असून ती आम्हाला निस्वार्थ सेवेची प्रेरणा देत राहिल, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. नानासाहेबांच्या प्रतिमा अनावरण समारंभात ते बोलत होते

. शुक्रवारी धरणगावात सद्गुरुची प्रतिमा आली आपल्या सत्कर्मांनी भविष्यात स्वत: सद्गुरुच येतील, असे ना. पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत हर्षोल्लासाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

याप्रसंगी प्रमोद मुळे यांनी प्रास्ताविक केले. रेवदंडा येथून काही मोजक्या लोकांनी सुरु केलेली ही समाज प्रबोधनाची चळवळ आज महासागरासारखी विस्तारली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या ही धुरा आप्पासाहेब समर्थपणे पुढे नेत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर प्रमोद लोखंडे, संजय विसपुते, गुलाबराव वाघ, रामभाऊ पोळ यांनी समयोचित भाषणे केली.

अनावरण प्रसंगी व व्यासपीठावर कॉंग्रेसचे राज्य सचिव डि. जी. पाटील, नगराध्यक्ष सलिम पटेल, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रमोद पाटील, सचिन पवार, प्रेमराज पाटील, उप नगराध्यक्षा सौ. सुरेखा महाजन, मुकुंद नन्नवरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, पो. नि. बी.डी.सोनवणे, नगरसेवक कैलास माळी, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, सौ. अंजली विसावे, सौ. अराधना पाटील, पार्वता पाटील, सौ. कल्पना महाजन, सौ. मंदा धनगर, भागवत चौधरी, सुनिल चौधरी, माजी नगराध्यक्षा सौ. उषा वाघ, सौ. संगीता मराठे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रामभाऊ पोळ, प्रमोद मुळे, संजय विसपुते, मोहन पाटील, विनोद माळी, प्रमोद पाटील, वृंदा तिल्हेकर, विकास पाटील, विजय माळी, प्रमोद लोखंडे, रामकृष्ण, पाटील, मनोज तायडे, प्रविण पाटील, रेखा लोखंडे, शोभाताई बेंडाळे, छाया पाटील, चित्रा सोनार, कविता पाटील, शितल मराठे, येवले, वृंदाताई, शोभा मराठे व सेवेकरींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन विवेक चौधरी यांनी तर आभार ना. पाटील यांचे स्विय सहाय्यक व समर्थ साधक विश्वनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला चार हजारावर श्री सद्गुरु समर्थ भक्त परीवार उपस्थित होता.

विवेकाची पुसट रेघ

श्रध्दा आणि अंधश्रद्धा यात एक पुसटशी विवेकाची रेघ असते. ती रेघ ओळखण्याची दृष्टी नानासाहेबांनी दिली, असे मत संजय विसपुतेंनी मांडले. त्यास परिपूर्ण निष्कामतेची साथ मिळाली तर माणसाला स्वतःतल्या स्व-देवाचा शोध लागतो असे ते म्हणाले.

धर्मनिरपेक्ष नगराध्यक्ष

कट्टर हिंदूत्ववादी शिवसेनेतील सलिम पटेल या मुस्लिम नगराध्यक्षांच्या कार्यकाळात नानासाहेबांंची प्रतिमा धररगाव नगरपालिकेत लागणे हे त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर मोहर उठवण्यासारखे असल्याचे अनेक वक्त्यांंनी नमूद करुन त्यांचा अप्रत्यक्ष गौरव केला.

भक्तांच्या हृदयी नानासाहेब

नानासाहेबांनी समाजाला विचारांचे दान दिले आहे. समर्थ भक्तांच्या हृदयात ते विराजमान आहेत. त्यामुळे हे विचार साधकाला दुष्कर्मापासून दूर ठेवतात. म्हणूनच हे सेवेकरी निष्काम सेवा देवू शकतात. हे एक व्रत असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येकजण जीवापाड प्रयत्न करतो असे गुलाबराव वाघ म्हणाले.

क्षणचित्रे

राजकारणात खोटं बोलावे लागतं. त्याशिवाय राजकारण चालत नाही असं ना. पाटील म्हणाले. आपण स्वत: रेवदांड्याला जाऊन आलोय व समर्थ बैठकीतही हजेरी लावली आहे असे ना. पाटील म्हणाले. सर्व साधकांसाठी आठवडे बाजारात वाहनतळ केला होता. प्रत्येकाने त्याचा काटेकोर उपयोग केला. भव्य व आकर्षक रांगोळ्या लक्षवेधून घेत होत्या. रस्त्याच्या दुतर्ङ्गा साधक हात जोडून सर्वांचे स्वागत करत होते. कार्यक्रमस्थळी स्वच्छतेसाठी साधक स्वतः प्रयत्न करत होते. साधकांच्या डोक्यावरील गांधी टोपी त्यांची ओळख पटवत होती.

LEAVE A REPLY

*