43 टक्के घोटाळे बँकांतून

0

नवी दिल्ली । दि. 10 वृत्तसंस्था-केंद्र सरकारने गेल्यावर्षी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक घोटाळा, हवाला, शेल कंपन्या यांच्यामार्फत काळा पैसा साठवणार्‍यांना चांगलाच दणका बसल्याचे चित्र समोर आले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या मनी लाँड्रिंग, हवाला अशा 3700 प्रकरणांचा तपास करीत आहे.

या विविध प्रकरणांच्या माध्यमातून 9,935 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचे व्यवहार झाले आहेत. यातील 43 टक्के घोटाळे बँक, अर्थविषयक बनावट संस्था आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून झाले आहेत, अशी माहिती ‘ईडी’चे संचालक कर्नाल सिंह यांनी गुरुवारी दिली.

आठ नोव्हेंबर 2016 ला केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळ्या पैशांसंबंधी प्रकरणांच्या जोखमीचे मूल्यमापन ईडीने केले असून, त्यासंबंधीचा एक अहवाल त्यांनी सादर केला आहे. या अहवालानुसार शेल कंपन्या, अर्थविषयक बनावट संस्था आणि बँकांतील आर्थिक घोटाळ्यांच्या माध्यमातून यातील 43 टक्के प्रकरणांत आर्थिक गुन्हे करण्यात आले आहेत.

कारवाईचा लेखाजोखा
‘ईडी’ने 3758 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले असून, त्यांचा तपास सुरू आहे. यापैकी 3567 प्रकरणांत फोरेक्स कायद्यांतर्गत तर 191 प्रकरणांत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 777 प्रकरणांत कारणे दाखवा नोटिसा आणि जप्तीचे आदेश देण्यात आले असून, 620 ठिकाणी छापे घातले आहेत.

LEAVE A REPLY

*