जैन इरिगेशनचा सहकारी नरेंद्र चौधरी अवैध वाळू वाहतुकीचा बळी

0

अवैध वाळू वाहतुक सर्वसामान्यांचा जीवावर

जळगाव (प्रतिनीधी) :- जैन इरिगेशनमधील सौर विभागात कार्यरत असलेले नरेंद्र दिनकर चौधरी या
सहकाऱ्याचा बळी अवैध वाळू वाहतुकीने घेतला. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना शिरसोली
जकात नाक्याजवळ घडली. अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आठवड्याभरात अवैध वाळू
वाहतुकीचा दुसरा बळी गेल्याने सर्वसामान्यांचा जीवावर वाळू वाहतुक उठली काय? असा उव्दिग्न प्रश्न
जळगावकरांकडून केला जात आहे.

जैन इरिगेशनमधील सहकारी नरेंद्र दिनकर चौधरी हे आपल्या दुचाकीने खाजगी कामासाठी कंपनीतून
घरी जात होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीला वाळुने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात चौधरींचा
जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरचालकाने वाळुने भरलेला ट्रॅक्टर मेहरूण तलावाच्या दिशेने नेत
पळ काढला.

रस्त्यात एका फार्म हाऊसजवळ वाळुने भरलेली ट्रॉली रिकामी केली. यानंतर काटेरी झुडपांमध्ये
ट्रॅक्टर लपविले. चालकाने ट्रॅक्टर मालकाला फोन करून ट्रॅक्टरजवळ बोलाविले. यानंतर दोघांनी मिळून ट्रॅक्टरच्या
नंबर प्लेट काढून तेथून दुचाकीवर तिघांनी पोबारा केला.

वाळू माफियांकडून माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत

झुडपात ट्रॅक्टर लपविलेले घेण्यासाठी ट्रॅक्टर मालकाने पंधरा ते वीस तरूण पाठविले होते. या तरुणांमधून
एकाने माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत घातली. दरम्यान प्रतिनिधीने छायाचित्र काढण्यास सुरूवात केल्यानंतर
सर्वांनी जागेवरुन पळ काढला.

प्रशासनाच्या आशीर्वादातूनच वाळू माफियांची दादागिरी

गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहराला लागून असलेले
उपरस्त्यांवरून राजरोसपणे वाहतुक सुरू आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. मात्र प्रशासन त्याकडे
‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या आशीर्वादातूनच वाळू माफियांची दादागिरी वाढली असल्याचे
वास्तव आहे. वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ना प्रशासन पुढे येत आहे ना कोणत्या सामाजीक संघटना.
यामुळे जळगावकरांचे अवैध वाळू वाहतुकीचे नाहक बळी जात आहे.

LEAVE A REPLY

*