एक मराठा लाख मराठातून आर्चीचे आईबाबा चित्रपटसृष्टीत

0
मुंबई | प्रतिनिधी : मराठी चिटपटात धुमाकुळ घालणार्‍या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे आईबाबाही आता पोरीच्या पावलांवर पाऊल ठेवत एक मराठा लाख मराठा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण करत आहेत.

रिंकूची आई आशा राजगुरू व वडील महादेव राजगुरू हे एक मराठा लाख मराठा या चित्रपटातून झळकणार आहेत. शेतकरी कुटूंबावर आधारीत एका युवकावर आधारीत हा चित्रपट आहे.

आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात उभा ठाकत तीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष यात दाखविला आहे. ठिणगीच्या रूपातील हे आंदोलन पुढे जनांदोलनात रूपांतरीत होते.

गणेश शिंदे या युवकाने हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून साई सिने या फिल्म्सने याची निमिर्ती केली आहे. संजय साळुखे, अतूल लोहार,गणेश सातोंर्डेकर याचे संगीत संयोजन आहे.

तर मिलींद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरूण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरूजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्‍वकर्मा व राधीका पाटील यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रर्दयीत होत आहे.

या चित्रपटात रिंकूचे आईबाबांही अभिनय करणार असल्याने आता राजगुरू कुटूंबच चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळणावर हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

*