रन फॉर यूनिटी कार्यक्रम शरीराच्या समृध्दीतून सामाजिक एकतेकडे नेणारा -आ स्मिता वाघ

0
अमळनेर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोहपुरुष सरदार वल्लभभाई जयंती निमित्त साकार झालेला रन फॉर युनिटी हा कार्यक्रम देशभरात सर्वच शहरात साजरा होत असून हा कार्यक्रम शारीरिक समृद्धीकडून सामाजिक एकतेकडे नेण्यासाठी मोलाचा ठरेल असे प्रतिपादन आ स्मिता वाघ यांनी करत ज्याप्रमाणे योग दिन देशभरात साजरा झाला त्याच प्रमाणे हा विषय देखील साजरा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला

भारतीय जनता पार्टी अमळनेर व न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी ऐकता दौड हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय  वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमास सुरवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ स्मिता वाघ होत्या त्यांनी न्यू व्हिजन स्कुल च्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेता आला अशी भावना व्यक्त करून शालेय व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,यावेळी भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख,जिल्हा चिटणीस महेश पाटील,नगरसेवक विवेक पाटील,प्रा रामेश्वर पाटील,महेश पाटील,विस्तारक सचिन पाटील,सरचिटणीस हिरालाल पाटील,दीपक पाटील,विजय राजपूत,महेश संदनशिव,उमेश वाल्हे,संजय पाटील व अशापाक शेख उपस्थित होते
सूत्रसंचालन रितीक मार्कंडे,तर आभार धनराज महाजन यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य संदीप महाजन,सॅम सर,राहुल सर,जोत्स्ना महाजन,दीपाली शिंदे ,वंदना मराठे,सोनाली कुलकर्णी ,मानसी भामरे,राजश्री पाटील आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी व भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*