हातेड केंद्र शाळेत मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

0
               
वेले, ता. चोपड़ा  | वार्ताहर  :   चोपडा तालुक्यातील श्री.शिवाजी आदर्श केंद्र शाळा हातेड येथे नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

सन २००३ साली इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांनी इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेऊन २००६ मध्ये शाळा सोडली होती.त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन  शाळेत त्यांना १ ली ते ४ पर्यंत शिकविणारे वर्गशिक्षक श्री.सतीश शिवाजी बोरसे व श्रीमती.ललिता देविदास पाटील यांना आमंत्रित करुण  त्यांचा या कार्यक्रमात सन्मान केला.

प्रथम सतीश बोरसे व ललिता पाटील या शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. शिक्षकांनाचा गौरव केला त्यात मुलींनी सतिष बोरसे तर मुलांनी श्रीमती.ललिता पाटील यांना शाल श्रीफळ व भेटवस्तु देऊन सन्मानित केले.

श्रीमती.ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपण जे शिक्षण घेत  आहात त्यात विशेष यश संपादन करून त्यात अजून आपण स्पर्धा परीक्षा पास होऊन प्रशासकीय सेवा संपादन करुण अधिकारी बना. खूप पुढे जा.असे मनोगतात सांगितले तर आपण आई वडिलांना विसरू नका सोबत समाजाची सेवा करा.नोकरी नसली तरी चालेल आपण कुठला तरी धंदा करा.जीवनात नैराश्याने होरपळून जाऊ नका.

शेतकऱ्यांना आत्महत्या  रोखण्यासाठी पर्यंत करा त्यांना बळ दया.खूप असे काही करण्यासारखे आहे.शिक्षण सोबत समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे.असे मौलिक मार्गदर्शन सतिष बोरसे यांनी केले.मुलांनी आपल्या मनोगतात महाराराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेचा गेट टू गेटर चा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम असावा असे सांगितले.

सदर कार्यक्रमास शाळेचे असंख्ये माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.आज सर्व मुले उच्च शिक्षण घेत आहेत हे विशेष आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शिक्षकांना सोबत वृक्षारोपन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य सोनवणे व माधुरी सोनवणे यांनी तर आभार ईश्वर सोनवणे याने केले.कार्यक्रम यशवितेसाठी  सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*