रस्त्यांसाठी जिल्ह्यास 15 कोटीचा निधी देणार!

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-खड्डेमुक्त रस्ते अभियानातंर्गत प्रत्येक जिल्ह्याला 15 कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज खड्डेमुक्त अभियानाच्या बैठकीत सांगितले. दरम्यान टीमवर्कच्या माध्यमातून प्रमूख रस्त्यांवरील खड्डे येत्या 15 डिसेंबरपर्यंत भरण्यात येवून रस्त्यांचे चित्र बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्डेमुक्त रस्ते अभियानाचा आढावा घेण्यासाठी येथील नियोजन भवनात सार्वजनिक बांधकाम मंडळची बैठक मंत्री ना. चंद्रकांत पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) उपसचिव अजय इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पगारे, अधिक्षक अभियंता प्रशांत पाटील, विशेष कार्य अधिकारी संतोष पराडकर, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री ना. पाटील म्हणाले की, राज्यातील रस्त्यांचा पाया पक्का नसल्याने पावसाळयात मोठया प्रमाणात खड्डे पडतात. आता पावसाळा संपल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्या भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामास गती द्यावी. चांगले काम करणार्‍यांच्या पाठीशी शासन नेहमीच राहील.

परंतु कामात कुचराई करणार्‍यांना कदापिही पाठीशी घालते जाणार नाही, असा इशाराही त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिला. अजिंठा ते जळगाव या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकार्‍यांना दिल्यात.

LEAVE A REPLY

*