25 कोटींच्या कामांना ग्रीन सिग्नल

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयाच्या कामांना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आली आहे.

एलइडीसाठी 10 कोटीचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील 3 कोटी कमी करुन विस्तारीत भागात 10 कोटीच्या गटारी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच महापालिकेच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक झाली.

यावेळी खा.ए.टी.पाटील, आ.राजूमामा भोळे, आ.चंदूलाल पटेल, आ.स्मिताताई वाघ, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दोन ते अडीच वर्षापासून 25 कोटीचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर हा प्रश्न निकाली लागला असून लवकरच विकास कामे केली जाणार आहेत. 25 कोटीच्या निधीतून कोणकोणती कामे करावीत. यासाठी विभाजन करण्यात आले होते. मात्र आज झालेल्या बैठकी पुन्हा बदल करुन विकास कामांबाबतची नवीन यादी तयार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*