रेल्वेतून उतरतांना कर्मचार्‍याचा मृत्यू

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-जळगाव येथील रहिवाशी असलेल्या रेल्वे कर्मचार्‍याचा भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरतांना खाली पडल्याने जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत भुसावळ रेल्वे पोलिस व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, प्रविण दगडू मोरे वय 44 रा. सबजेल परिसर हे भुसावळ येथील रेल्वे बँक सोसायटीत वरिष्ठ लिपीक म्हणून कामाला आहे.

ते नोकरीनिमित्त दररोज जळगाव-भुसावळ ये-जा करीत होते. आज सकाळी ते कामाला जाण्यासाठी जळगाव येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले.

महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ येथे पोहचत असतांना फ्लॉटफार्म क्रमांक 4 वर रेल्वेतून उतरतांना प्रविण मोरे गंभीर जखमी झाले. ही घटना कळताच फ्लॉटफार्मवरील रेल्वे पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रविण मोरे यांना रेल्वे व फ्लॉटफार्ममधून बाहेर काढून तात्काळ भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

या ठिकाणी जखमी मोरे यांना जळगावी हलविण्याचे सांगितले. त्यानुसार रेल्वे पोलिस कर्मचारी नावेद खान व गोंविद मिन्हा यांनी जखमी मोरे यांना गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले.

याठिकाणी उपचार सुरु असतांना मोरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार असून घटनेची माहिती कळताच नातेवाईक, मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी कुटुंबिय, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.

वडीलांनीच पटविली ओळख
रेल्वे कर्मचारी प्रविण मोरे सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने जात होते. योगायोगाने त्यांचे वडील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दगडु मोरे हे देखील त्याच रेल्वेने भुसावळ येथे जात होते. घटना घडल्यानंतर दगडू मोरे त्याठिकाणी पाहण्यासाठी गेले असता, जखमी आपल्याच मुलगा असल्याचे त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्धा तास रेल्वे थांबून
जळगाव येथून सुटलेली महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकात येत असतांना फ्लॉटफार्म क्रमांक 4 वर रेल्वेतून उतरतांना खाली पडल्याने प्रविण मोरे जखमी झाले होते. त्यामुळे भुसावळ रेल्वेस्थानकावर जवळपास अर्धातास महाराष्ट्र एक्सप्रेस थांबून होती.

उपचार न झाल्याने मोरे यांचा मृत्यू
रेल्वेतून उतरतांना पडल्याने मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वेळेवर उपचार न झाल्याने रेल्वे पोलिस कर्मचारी नावेद खान व गोविंद मिना यांनी मोरे यांना गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे रेल्वे कर्मचार्‍यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*