कॉंग्रेस प्रदेश निवडणूक अधिकारीपदी डॉ.उल्हास पाटील

0
जळगाव |  प्रतिनिधी :  संघटनात्मक निवडणुकांसाठी कॉंग्रेसच्या प्रदेश निवडणूक अधिकारीपदी माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांची केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे.

सन २०१७ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम देखील प्रदेश पातळीवर जाहीर झाला आहे.

दरम्यान या निवडणुकांच्या प्रदेश निवडणूक अधिकारीपदी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांची केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी नियुक्ती केली आहे.

तसेच कॉंग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीसाठीही तातडीने ठोस पाऊले उचलून निवडणुकांबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांना केंद्रीय पातळीवरुन करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*