प्राथमिक आरोग्य केंद्राची मालोदकरांना लागली आस

0
महेश पाटील| उंटावद, ता. यावल | दि. ८  :  येथून जवळच असलेल्या मालोदकरांना मंजुर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आस लागली आहे. प्राथमिक आरेाग्य केंद्रांसाठी शासनाने जागा मंजुर केली असून तेथे बांधकाम होत आरोग्य सेवा केव्हा सुरू होतील याची ते वाट पाहत आहेत.

किनगावला सध्या सुरू असलेल्या प्राथमीक आरोग्य केंद्र मालोदला हालवुन किनगाव येथे ग्रामीण रूग्णालय व्हावे यासाठी तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने विरोधीपक्ष नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या मागणीला होकार देत तात्काळ मंजुरी देली होती.

मात्र या मंजुरीला पाच वर्षे होत आली परंतु काहीही हालचाल होतांना दिसत नाही. जोपर्यत किनगावला ग्रामीण रूग्णालय होत नाही तोपर्यंत किनगावला सुरू असलेले प्राथमीक आरोग्य केंन्द्र मालोदला हलविता येणार नाही. म्हणुन मालोदची प्राथमीक आरोग्य केंद्रासाठीची नियोजीत जागा आजही पडीतच पडली आहे.

सात गावांना होणार फायदा

मालोदसह वाघझीरा, इचखेडा,चिपखेडा, मनापुरी,रूईखेडा व आंबापाणी या सारख्या गावांना मालोदला प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास उपचाराचा लाभ घेता येईल. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी किनगावला यावे लागते.

काही गावांना तर रस्तेही पुर्ण नाहीत. म्हणुन काही अंतर पायी चालावे लागते. मात्र पुढील उपचारासाठी जळगावला जिल्हा रूग्णालयात जावे लागते. जर किनगावला ग्रामीण रूग्णालय झाले तर जळगावला जाण्याची गरज भासणार नाही.

पण लक्ष कोण देणार ?

किनगावला ग्रामीण रूग्णालय व्हावे व किनगावचे प्राथमीक आरोग्य केंद्र मालोदला सुरू व्हावे अशी मागणी मालोदसह परीसरातील नागरीक करीत आहे. असे असले तरी याकडे कोण लक्ष देणार हा प्रश्‍नही अनुत्तरीतच राहत आहे.

LEAVE A REPLY

*