नोव्हेंबर २०१८ मध्ये एक लाख भारतीय करणार ‘मंगळ’ वारी

0
मुुंबई| प्रतिनिधी : २६ नोव्हेंबर २०१८ या दिवशी एक लाख ३८ हजार ८९९ भारतीय अमेरीकेतून ‘मंगळ ‘ ग्रह वारी करणार आहेत. ७२० दिवसांची ही मोहिम असून अमेरीकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्रातर्फे ही संधी देण्यात आली आहे.

या मंगळ वारीसाठी नासाने तिकिट बुकिंग करण्यात आली होती. त्यास जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. नासाच्या इनसाईट मिशन नुसार देशभरातील नागरीकांना मंगळावर नेण्याची मोहिम आखली आहे.

अशी आहे मंगळ स्वारी

मंगळ ग्रहावर जाण्यासाठी ज्यांनी तिकिट बुक केले आहे. त्यांना नासाकडून ऑनलाईन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. या सर्वांची नावे एका सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहे. या मोहिमेत अमेरीकेतून ६ लाख ७६ हजार ७७३ , चिनमधून २ लाख ६२ हजार ७५२ लोकांनी बुकिंग केली आहे. ७२० दिवसाच्या या मोहिमेत २६ नोव्हेबर २०१८ रोजी हे सर्वजण मंगळ ग्रहावर पोहचणार आहेत.

LEAVE A REPLY

*