चाळीसगाव येथे जेलमध्ये कैैद्याचा शर्टाने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न !

0
चाळीसगाव। दि. 12 । प्रतिनिधी |  चाळीसगाव येथील मोटारसायंकल चोरीच्या गुन्हांत जेलमध्ये बंद असलेल्या कैदाने शर्टाच्या साह्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

हि घटना दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान घडली, यामुळे पोलीस स्टेशनला एकच खळबळ उडाली आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी दावाखान्यात दाखल केेल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.

विश्वनाथ मधुकर चव्हाण रा.टाकळी प्र.चा. ह्या काल मोटार सायंकल चोरी प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याने 18 ते 20 मोटार सायंकल चोरी केल्या असून त्यापैकी तीन त्याने काढुन दिल्याची माहिती सामोर आली आहे. आज त्याला पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयातून त्याला परत जेल मध्ये टाकल्या नतंर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्याने संधी साधून अंगातील शर्टाच्या साह्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केल्या. परंतू पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालायत दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. सध्या तो खाजगी दावाखान्या पोलीसांच्या निगरानीमध्ये उपचार घेत आहे.

कैदाने जेलमध्ये फाशी घेण्याचा प्रयत्न केला. परंतू वेळीच त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. त्याची परिस्थिती आता धोक्याबाहेर आहे.
प्रशांत बच्छाव (अप्पर पोलीस अधिक्षक)

LEAVE A REPLY

*