मनपा, हुडकोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

0

जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी स्थगिती देण्यात यावी यासाठी मनपाने न्यायालयात याचीका दाखल केली होती.तर मनपाने डिक्री नोटीनुसार 341 कोटी रुपयांच्या 75 टक्के रक्कम भरण्यासाठी हुडकोने देखील याचिका दाखल केली होती.

दरम्यान आज न्यायालयात कामकाज झाले असता. दोघ याचिका कर्त्यांची नोटी फेटाळून येत्या तीन महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश डिआरटीला न्यायालयाने दिले आहे.

घरकुल, वाघूर पाणीपुरवठा योजना, रस्ते व व्यापारी संकुलासह विविध योजनांसाठी तत्कालीन नगरपालिकेने हुडकोकडून 141 कोटी 34 लाखांचे कर्ज घेतले होते.

या प्रस्तावात 2011 ते 13 पर्यंत हुडकोला एक रुपये भरले नसल्याचे समोर आले आहे. दर महिन्याला दिला जाणारा 3 कोटी 75 लाख रुपयाचा हप्ताला स्थगिती मिळावी यासाठी मनपातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर हुडकोने डिक्रीनुसार मनपाकडे 341 कोटी बाकी असून त्यातील 75 टक्के रक्कम मनपाने भरावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर आज कामकाज झाले असता. न्यायालयाने दोघांच्या याचिका फेटाळून लावत डीआरएटीला तिन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY

*